Assam Rifles' sakal
देश

Assam Rifles : मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणातच; ‘आसाम रायफल्स’चे स्पष्टीकरण; अनेक व्हिडिओ चुकीचे

पत्रसूचना कार्यालयाने माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित केलेल्या आसाम-मेघालय दौऱ्याअंतर्गत

सारंग खानापूरकर

शिलॉंग - ''मणिपूरमध्ये निर्माण झालेला वाद बऱ्यापैकी निवळला आहे. या राज्यात आता शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे आणि पूर्वपदावर येत आहे,'' अशी माहिती आसाम रायफल्सतर्फे आज देण्यात आली. मणिपूरच्या घटनेबाबत अनेक चुकीचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले होते, असेही स्पष्ट करण्यात आले. म्यानमार सीमेवरही दलाचे पूर्ण नियंत्रण आहे, असे सांगण्यात आले.

पत्रसूचना कार्यालयाने माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित केलेल्या आसाम-मेघालय दौऱ्याअंतर्गत आज शिलॉंग येथील आसाम रायफल्सच्या कार्यालयाला भेट दिली. सातारा सैनिक स्कूल आणि पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी या संस्थांचे माजी विद्यार्थी असलेले आणि अस्खलित मराठी बोलणारे लेफ्टनंट जनरल प्रदीप नायर हे आसाम रायफल्सचे महासंचालक आहेत. भारत आणि म्यानमार यांच्यादरम्यान असलेल्या १६४३ किलोमीटर लांबीच्या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आसाम रायफल्सवर आहे.

मात्र, केवळ इतकेच नाही तर, ईशान्य भारतात कोठेही अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी आसाम रायफल्सचे जवान हजर असतात. प्रसंगी सीमेवर शत्रूशी लढण्यासाठीही हे सज्ज असतात. सुरवातीला आसाम रायफल्सच्या १८८ वर्षांच्या इतिहासाची, कामकाजाची, कामात झालेल्या बदलांची आणि सध्या त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची माहिती घेतल्यावर लेफ्टनंट जनरल नायर यांच्याशी संवाद साधला.

म्यानमारला जोडून असलेल्या भारताच्या सीमेचे रक्षण आणि घुसखोरी रोखणे, ही आमच्यावर जबाबदारी आहे. ईशान्य भारतात घुसखोरी आता फारशी नसली तरी मणिपूर, नागालँड, दक्षिण अरुणाचल या भागांमध्ये काही प्रमाणात त्याचा त्रास होतो. पण अशी परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. मणिपूरमधील घटनांच्या बाबतीतही अनेक चुकीचे व्हिडिओ माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले होते. मात्र आता परिस्थितीवर नियंत्रण असून इंटरनेट सेवाही हळूहळू पूर्वपदावर येत आहे,"

-प्रदीप नायर, लेफ्टनंट जनरल

तस्करी रोखण्याचे आव्हान

भारत आणि म्यानमारदरम्यानची सीमा बऱ्यापैकी खुली आहे. हा आदिवासीबहुल भाग असून आदिवासींचेही अनेक समुदाय आहेत. या समुदायातील काही टक्के जण म्यानमारमध्ये तर, काही प्रमाणात भारतात आहेत. दोन देशांची सीमा त्यांना फार प्रमाणात वेगळे करू शकलेली नाही.

त्यामुळे व्यापार होत असतो. मात्र त्याबरोबर तस्करीही होते. दरवर्षी या सीमेवरून अकराशे ते बाराशे कोटींची तस्करी होते. त्यातही सिंथेटिक अमली पदार्थांचे प्रमाण अधिक आहे. ही तस्करी रोखण्याचे आसाम रायफल्स समोर आव्हान आहे. त्यासाठी म्यानमार सरकारशी चर्चा सुरू आहे, पण अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळाला नसल्याचेही आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यपालांशीही संवाद

दरम्यान मेघालयाचे राज्यपाल फागु चौहान यांचीही पत्रकारांनी राजभवनात जाऊन सदिच्छा भेट घेतली. मेघालयमधील विविध ठिकाणांना भेटी देण्याचा आणि येथील संस्कृतीची ओळख करून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Vastu Tips: धुळीच्या भीतीने घराच्या खिडक्या २४ तास बंद ठेवताय? वास्तूशास्त्रानुसार ओढावू शकतात 'या' ५ मोठ्या अडचणी!

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT