Basavaraj Bommai esakal
देश

Political News : 'मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन'; भाजपच्या सभेत CM बोम्मईंचा मोठा दावा

देवानं मला कर्नाटक मातेची सेवा करण्याची संधी दिली आहे. मी प्रामाणिकपणे काम केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध समुदायांचं सहकार्य मागितलं आहे. बसवेश्वरांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर (Karnataka Assembly Election) पुन्हा सत्तेत परतणार असल्याचा दावा केलाय.

मी कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येईन, असं बोम्मई यांनी सभेत सांगितलंय. देवानं मला कर्नाटक मातेची सेवा करण्याची संधी दिली आहे. मी प्रामाणिकपणे काम केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

उत्तर कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील हुनागुंड इथं एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'मी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं आहे, त्यामुळं राज्याच्या दरडोई वार्षिक उत्पन्नात वाढ झाली आहे.'

12 व्या शतकातील समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या 'काम हीच पूजा' आणि सामाजिक समतेचा मार्ग आपण अवलंबत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

बोम्मई पुढं म्हणाले, "मी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध समुदायांचं सहकार्य मागितलं आहे. बसवेश्वरांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत." यावेळी बोम्मईंनी सभेत मी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येईन, असा दावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

Latest Marathi Breaking News : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील अमीर रशीद अलीची १० दिवसांची कोठडी एनआयएकडे

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुलाचं नाव अभिनय का ठेवलं? रेणुका शहाणे यांनी सांगितलं कारण, वाचून वाटेल अभिनेत्याचं कौतुक

SCROLL FOR NEXT