Assembly Elections 2023: Jammu and Kashmir Esakal
देश

Assembly Elections 2023: जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार? निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं

Assembly Elections Jammu and Kashmir 2023: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सोमवारी जाहीर झाल्या. पण यामध्ये जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीचा समावेश नाही. सुप्रीम कोर्टानं काही दिवसांपूर्वी या ठिकाणी निवडणूक कधी होणार? तसेच याला राज्याचा दर्जा पुन्हा कधी बहाल करणार? असे सवाल सरकारला विचारले होते.

त्यामुळं आजच्या पत्रकार परिषदेत जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुका देखील जाहीर होतीलं, असं वाटत होतं. पण याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीककुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Assembly Elections 2023 Will there be elections in Jammu and Kashmir or not Election Commissioner Rajiv Kumar made it clear)

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजीव कुमार म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता तसेच राज्यातील इतर निवडणुकांसोबतच परिस्थितीनुसार इथं निवडणुका घेण्यात येतील. त्यामुळं योग्य वेळ येताच जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकांबाबत माहिती दिली जाईल. (Latest Marathi News)

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका कधी घेणार? - सुप्रीम कोर्ट

कलम ३७० संदर्भातील याचिकांवर सुनावणी करताना जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका कधी घेणार? असा सवाल एक महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारला होता. यावर उत्तर देताना महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी म्हटलं होतं की, जम्मू आणि काश्मीरच्या विभाजनानंतर लडाख कायम स्वरुपी केंद्रशासित प्रदेश राहील.

तर जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर तर लडाखमध्ये कारगील आणि लेहमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी माहिती केंद्र सरकारच्यावतीनं महाधिवक्ता मेहता यांनी सुप्रीम कोर्टात दिली होती.

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, तेलंगाणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आज जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार, छत्तीसगडमधील दोन टप्प्यातील मतदान वगळता इतर चार राज्यांत एकाच टप्प्यात मतदान होईल. (Marathi Tajya Batmya)

मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबर, राजस्थानात २३ नोव्हेंबर, तेलंगाणात ३० नोव्हेंबर, मिझोराम ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. यानंतर सर्व पाच राज्यांचा निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT