Punjab  sakal
देश

Punjab : संत नामदेवांकडून भक्ती संप्रदायाचा पाया;पंजाबचे राज्यपाल पुरोहित यांचे प्रतिपादन,घुमान येथे यात्री निवासाचे भूमिपूजन

‘‘बाराव्या शतकात उत्तर भारतात भागवत धर्माचे प्रचारक म्हणून संत नामदेव महाराजांचे कार्य श्रेष्ठ आहे.

सकाळ वृत्तसेवा

श्री क्षेत्र घुमान (पंजाब) : ‘‘बाराव्या शतकात उत्तर भारतात भागवत धर्माचे प्रचारक म्हणून संत नामदेव महाराजांचे कार्य श्रेष्ठ आहे. पंजाबमध्ये त्यांनी सामाजिक ऐक्याचे आणि वारकरी संप्रदायाचे विचार दिले. पंजाब व महाराष्ट्र हे दोन प्रांत आध्यात्मिकदृष्ट्या जोडण्याबरोबरच प्रेम व भक्ती संप्रदायाचा पाया संत नामदेवांनी रचला. अशा संतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो,’’ अशा भावना पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी घुमान येथे व्यक्त केल्या.

घुमाण येथील नामदेव दरबार कमिटी, महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ यांच्या वतीने घुमान येथे उभारण्यात येत असलेल्या संत नामदेव महाराज यात्री निवासाच्या इमारतीचे भूमिपूजन पुरोहित यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, श्री नामदेव दरबार कमिटीचे अध्यक्ष हरजिंदर सिंह, सुभाष भांबुरे, तरसेम सिंह, सुखजिंदर सिंह, मनजिंदर सिंह, सरबजित सिंह, सरपंच नरेंद्र सिंह, उपाध्यक्ष रघुवीर सिंह, डॉ. अजय फुटाणे, बाळासाहेब आंबेकर, रामभाऊ बगाडे उपस्थित होते.

भोसले म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अध्यात्माविषयी निरंतर श्रध्दा व विश्वास आहे. घुमान येथील माहात्म्य लक्षात घेऊन पंजाबच्या राज्यपालांनी केलेले काम अद्वितीय आहे. महाराष्ट्र सरकारही निश्चित मदत करेल.’’

घुमान येथे यात्री निवास उभारण्यासाठी पंजाबकडून एक कोटींचा निधी मंजूर केला.उर्वरित एक कोटीच्या निधीची तरतूद महाराष्ट्र सरकारने करावी, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलतो आहे.

- बनवारीलाल पुरोहित, राज्यपाल, पंजाब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

SCROLL FOR NEXT