Astrazeneca to stop production and sale of covishield vaccine Esakal
देश

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Astrazeneca: यापूर्वी कंपनीने न्यायालयीन कागदपत्रांमध्ये कबूल केले होते की, त्यांनी निर्मित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम होऊ शकतात.

आशुतोष मसगौंडे

कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर AstraZeneca कंपनीने नुकतेच स्पष्ट केले की, त्यांनी जगभरातील कोविड -19 लस मागे घेण्यास सुरुवात केली आहे.

दिग्गज फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ची Covid-19 लस जागतिक स्तरावर मागे घेतली जात आहे. यापूर्वी कंपनीने न्यायालयीन कागदपत्रांमध्ये कबूल केले होते की, त्यांनी निर्मित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यानंतर आता कंपनीने म्हटले आहे की, व्यावसायिक कारणास्तव ही लस बाजारातून काढून टाकली जात आहे.

कंपनीने सांगितले की, यापुढे या लशीची निर्मिती किंवा विक्री केली जाणार नाही, असे वृत्त टेलिग्राफने मंगळवारी दिले होते. (Astrazeneca to stop production and sale of covishield vaccine)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अँग्लो-स्वीडिश औषध निर्मात्या कंपनीने न्यायालयाला दिलेल्या कागदपत्रांमध्ये यापूर्वी कबूल केले आहे की, लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या आणि रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे यासारखे दुष्परिणाम होतात.

टेलीग्राफच्या म्हणण्यानुसार, लस मागे घेण्याचा फर्मचा अर्ज 5 मार्च रोजी करण्यात आला होता आणि तो 7 मे रोजी लागू झाला.

लंडनमध्ये सूचीबद्ध असलेल्या AstraZeneca ने कोविड-19 औषधांच्या विक्रीत घट झाल्यानंतर, गेल्या वर्षी व्हायरस लस आणि लठ्ठपणाच्या औषधांची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती.

AstraZeneca ने कोरोनावर उपचार म्हणून Vaxzevria ही लस निर्माण केले होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देखील उत्पादित केली आहे, ती भारतात Covishield नावाने विकली गेली.

कोविशील्ड लसीचे दुष्परिणाम तपासण्यासाठी वैद्यकीय तज्ञ पॅनेल तयार करण्याचे निर्देश जारी करण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली होती, ज्यांनी साथीच्या आजाराच्या काळात लसीकरण मोहिमेमुळे गंभीरपणे अक्षम झालेल्या नागरिकांसाठी लस नुकसान भरपाई प्रणाली स्थापन करण्यासाठी केंद्राला निर्देश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली होती.

“जागतिक साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी वॅक्सझेव्हरियाने बजावलेल्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. अंदाजानुसार, याच्या वापराच्या पहिल्या वर्षात 6.5 दशलक्षाहून अधिक जीव वाचवले गेले आणि जागतिक स्तरावर तीन अब्जाहून अधिक डोस पुरवले गेले. आमच्या प्रयत्नांना जगभरातील सरकारांनी मान्यता दिली आहे आणि जागतिक साथीच्या रोगाचा अंत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक म्हणून व्यापकपणे ओळखला जातो, ” असे ॲस्ट्राझेनेकाने म्हटल्याचे वृत्त टेलिग्राफने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT