Atiq Ahmed esakal
देश

Atiq Ahmad Murder : प्रसिद्धीसाठी शूटर्सनी अतिक-अशरफवर झाडल्या गोळ्या; पोलीस चौकशीत मोठा खुलासा

याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आतापर्यंतच्या पोलीस तपासात या प्रकरणाशी कोणताही राजकीय संबंध आढळून आलेला नाही.

Atiq Ahmad Murder : गुंड-राजकारणी बनलेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करणाऱ्या तीन शूटर्सची पार्श्वभूमी काय? हत्येमागं नेमकं कारण काय? गुन्हेगारांना काय हवं होतं? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. हे तिन्ही शूटर्स कोण आहेत आणि त्यांना काय हवं होतं, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे.

याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. ताज्या माहितीनुसार, नाव आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी या शूटर्सनी ही घटना घडवली. प्राथमिक तपासात याची पुष्टी झाली आहे. म्हणजेच, आतापर्यंतच्या पोलीस तपासात या प्रकरणाशी कोणताही राजकीय संबंध आढळून आलेला नाही. तसंच यात कोणत्याही टोळीचा किंवा माफियाचा हात नाही. आरोपींनी केवळ प्रसिद्धीसाठी एवढी मोठी घटना घडवली.

प्रयागराज पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना ठार मारुन आम्हाला लोकप्रिय व्हायचं होतं, असं हत्येमध्ये सहभागी असलेल्या तीन शूटर्सनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं. प्रयागराजचे पोलीस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितलं की, अतीक अहमद, त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना वैद्यकीय उपचारासाठी आणलं होतं. मात्र, तीन लोक तिथं आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तिथं जागीच दोघांचा मृत्यू झाला. तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

बांदा येथील रहिवासी लवलेश तिवारी, हमीरपूरचा रहिवासी सनी सिंह आणि कासगंजचा रहिवासी अरुण मौर्य अशी तीन आरोपींची नावं आहेत. तिघंही पोलिस कोठडीत आहेत. प्राथमिक तपासात त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT