Atiq Ahmed
Atiq Ahmed esakal
देश

Atiq Ahmed Case : अतिकनं मुस्लिमांना केलं लक्ष्य तर अशरफनं अल्पवयीन मुलींचं अपहरण करुन केला बलात्कार!

सकाळ डिजिटल टीम

अतिकचा भाऊ अशरफ यानं मदरशातून दोन अल्पवयीन मुस्लिम मुलींचं अपहरण केलं आणि बंदुकीच्या जोरावर रात्रभर त्यांच्यावर बलात्कार केला.

Atiq Ahmed Murder Case : अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर पीडित कुटुंबीयांच्या व्यथा समोर येऊ लागल्या आहेत. अशा 20 प्रमुख लोकांची यादी पोलिसांनी जारी केली आहे.

अतिक आणि त्याच्या टोळ्यांनी आपला आणि त्यांच्या कुटुंबाचा कसा छळ केला, याबाबत लोक बोलू लागले आहेत. यात 20 पैकी 13 मुस्लिम कुटुंबांचा समावेश आहे.

मदरशातून अपहरण केलेल्या दोन अल्पवयीन मुस्लिम मुलीही बलात्काराच्या बळी ठरल्या आहेत. जमिनीच्या हव्यासापोटी अतिकनं बहुतांश हत्या आणि हल्ले केले होते. खंडणीचे पैसे न दिल्यानंही अनेकांचा छळ करण्यात आला. अतिकवर प्रयागराजमधील विविध पोलिस ठाण्यांत एकूण 102 गुन्हे दाखल आहेत. तर, त्याच्या टोळीत 200 हून अधिक जणांची नावं आहेत. ही टोळी अतिक चालवत होता. त्याच्या सांगण्यावरूनच हिंसक घटना घडत होत्या.

केल्विन हॉस्पिटलमध्ये अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर पीडित कुटुंबीयांच्या व्यथा समोर येऊ लागल्या आहेत. अशा 20 प्रमुख लोकांची यादी पोलिसांनी जारी केली आहे. यात उमेश पाल यांची पत्नी जया पाल, प्रॉपर्टी डीलर झीशान, मदरसा प्रकरणात बलात्कार झालेल्या मुलीच्या वडिलांचं नाव, 1995 मध्ये हत्या झालेल्या अशोक साहूच्या कुटुंबाचं नाव आहे.

अतिकचा भाऊ अशरफ यानं मदरशातून दोन अल्पवयीन मुस्लिम मुलींचं अपहरण केलं आणि बंदुकीच्या जोरावर रात्रभर त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांना मदरशाबाहेर सोडलं, असा आरोप आहे. 1994 मध्ये हत्या झालेला अशफाक कुन्नू यांचं कुटुंब, 2003 मध्ये मारले गेलेले भाजप नेते अशरफ, मकसूद, देवरिया जेल घटनेतील पीडित मोहम्मद, मोहित जैस्वाल आणि लखनौच्या अर्शदचंही नाव आहे. या शिवाय, अलकामा हत्याकांडातील पीडित जाबीर आणि आबिद प्रधान, कौन्सिलर सुशील यादव, कौन्सिलर सौद, सुरक्षा प्रभारी रामकृष्ण सिंह आणि शबीर यांचाही पोलिसांच्या यादीत समावेश आहे. मात्र, 2005 मध्ये मारले गेलेले बसपा आमदार राजू पाल यांच्या कुटुंबाचं यात नाव नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT