देश

Irfan Hasan Extortion:माफिया अतिक अहमदच्या टोळीतील गुंड इरफान हसन पोलिसांच्या तावडीत, ५० लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक

Irfan Hasan:इरफान हसन याला ५० लाखांच्या खंडणी मागत धमकी देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

UP extortion Case:माफिया अतिक अहमद टोळीचा सहकारी इरफान हसन याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. धूमनगंज पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. कोशंबीमधील सैलाबी गावाचा रहिवाली असलेला इरफान अतिक अहमद याचा नातेवाईक आहे. पोलिसांनी खंडणीच्या आरोपाखाली कारवाई करत या घटनेत वापरण्यात आलेली क्रेटा कारही जप्त केली आहे.

तसेचं या प्रकरणात खालिद जफर बरोबरचं बाकीचे आरोपी फरार आहेत. खालिद जफर, त्याचा भाऊ माज आणि इरफानवर ५० लाखांची खंडणी आणि धमकी देण्याच्या आरोप करत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये २४ फेब्रुवारी या दिवशी वकील उमेश पाल याची भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या अतिक अहमदचा मुलगा असद अहमद याला पोलिसांनी एनकाऊंटर करत कंठस्नान घातले होते. उर्वरित ३ आरोपींचा देखील एनकाऊंटर करण्यात आला. मात्र, या घटनेत विस्फोटकांचा वापर करणारा गुड्डू मुस्लिम अद्याप फरार आहे. तसेचं अतिक अहमदची बायको शायस्ता परवीन देखील फरार आहे.

गुड्डू मुस्लिमबद्दल समाज माध्यमांवर चर्चांना उधाण आलंय. त्याच्याबद्दलच्या अफवा गल्ली-बोळ्यात ऐकायला मिळत आहेत. मात्र, २४ फेब्रुवारीला ही घटना घडवून आणल्यापासून उत्तरप्रदेश पोलिसांच्या हाती अजून लागलेला नाही.

गुड्डूने प्रयागराज पोलिसांना दिला चकवा

गुड्डू मुस्लिम शेवटी गेला कुठे ? या प्रश्नाचं उत्तर ना प्रयागराज पोलिसांकडे आहे , ना उमेश पाल हत्या प्रकरणाची चौकशी करण्याऱ्या विशेष तपास दलाकडे. यूपी एसटीएफकडून अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली असून त्याचा कुठेही ठावठिकाणा लागलेला नाहीये.

गुड्डू मुस्लिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, कर्नाटक , गोवा, मुंबई, नागपुरमध्ये लपलाच्या बातम्या समोर येत आहेत. पोलिसांनी यूपीच्या मेरठमध्ये, श्रावस्तीपासून झाशीपर्यंत छापेमारी केली. मात्र, गुड्डू मुस्लिमला पकडण्यात त्यांना यश आलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT