atique ahmed news esakal
देश

Atique Ahmed News : गाईची धडक ते एक तास ब्रेक, एन्काऊंटरची टांगती तलवार असणाऱ्या आतिकचा साबरमती ते यूपी प्रवास

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील माफिया डॉन अतिक अहमद याला उत्तर प्रदेशात नेण्यात आल आहे. या प्रवासात काही वेगळं काही होतंय का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

गुजरातमधील साबरमती येथून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे रोडने त्याला पोलीस घेऊन गेले. मात्र त्याच्या या प्रवासादरम्यान अतीक अहमद घाबललेला होता. गाडी उलटेल किंवा पोलीस त्यांचे एन्काऊंटर करतील या भीतीने अतीक अहमद संपूर्ण प्रवासात घाबरलेला होता. त्याच्या या प्रवासात नेमकं काय काय झालं हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (Atique Ahmed News)

माफिया डॉन अतिक अहमद प्रयागराजचा प्रवास हा साबरमतीहून सुरू झाला. पण तुरुंगातून बाहेर पडल्यापासून स्वतःच्या हत्येची भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. अतिकच्या नावावर शेकडो गुन्हा दाखल आहेत, मात्र असं असून देखील त्याच्या डोळ्याच मृत्यूची भीती दिसत होती. अतिकच्या सोबत उत्तर प्रदेश पोलिसांची स्पेशल ४५ टीम देखील हा प्रवास करत होती.

अभेद्य सुरक्षेत उत्तर प्रदेशच्या दिशेने निघालेला हा ताफा रात्री सात वाजता हिम्मतनगर पर्यंत पोहचला होता, या ताफ्यासोबत युपी पोलिसांची टीम यासोबतच मीडियाच्या वाहनांची रांग देखील होती. सोबतच अतिकचे कुटुंबिय देखील या ताफ्यासोबतत होते. 'आज तक'ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

रात्री ९ वाजता...

रात्री जवळपास ९ वाजता अतीकला घेऊन निघालेला युपी पोलिसांचा ताफा ऋषभदेव उदयपूर हायवेवर थांबला. यावेळी देखील अतिकच्या हृदयाचे ठोके वाढल्याचं पहायला मिळाला. पोलिसांचा ताफा वॉशरूम ब्रेकसाठी थांबला होता, यावेळी तो घाबरलेला दिसत होता. पोलिस कर्मचारी अतीकला पकडून घेईन जात होतो, यादरम्यान तो अगदी हळूहळू पावले टाकत होता.

रात्री १०: ३६ वाजता

उदयपूर येथील पेट्रोल पंपवर पुन्हा एकदा पोलिसांचा ताफा थांबला. यावेळी पोलिस गांड्यामध्ये पेट्रोल भरण्यात आलं. यावेळीदेखील अतिक घाबरलेला दिसला. मात्र या वेळी देकील पेट्रोल भरून झाल्यावर पोलिसांचा ताफा पुढे रवाना झाला. रात्री जवळपास दीड वाजता पोलिसांचा ताफा कोटा येथे पोहचला होता.

सकाळी ७ : ३० वाजता

रात्री तब्बल साडे तीन वाजता राजस्थान हद्दीतून बाहेर पडल्यानंतर युपी पोलिसांचा ताफा मध्य प्रदेशात दाखल झाला . मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे अतीक अहमदच्या हृदयाचे ठोके पुन्हा एकदा वाढले, याला कारण होतं पोलिसांचा ताफा गायींच्या कळपात घुसला. या अपघातात एक गायी जखमी झाल्याने ताफा काही वेळ येथे थांबला.

गाडी पलटी होता-होता राहिली

अतीक अहमदचा ताफा खराई चेकपोस्टहून पुढे शरकाल तसे पोलिस व्हॅनच्या पुढे गाय आली . ही गाय अतिक अहमद याच्या गाडीलाच धडकली, या अपघातात गायीचा मृत्यू झाला. पण सुदैवाने गाडी पलटली नाही, यानंतर ताफा काही काळासाठी थांबवण्यात आला आणि नंतर काही वेळाने तो युपीला रवाना झाला.

सकाळी ९ वाजता

२७ मार्चच्या सकाळी अतीक अहमद उत्तर प्रदेशच्या सीमेत दाखल झाला . आधी झांसी सीमेत दाखल होताच अतीकच्या धडधड पुन्हा वाढली, अतिक अहमदला झांसी पोलिस लाइन नेण्यात आलं,येथे ताफा तब्बल एक तास थांबला. यादरम्यान अतिकच्या बहिणीचं टेन्शन देखील वाढल्याचं पाहायला मिळालं, तब्बल एक तासाच्या थांब्यानंतर ताफा प्रयागराजच्या दिशेने रवाना झाला.

दुपारी १२ वाजता

अतिक अहमद चा ताफा पुन्हा एकदा जालौन येथे थांबवण्यात आला. पेट्रोल पंपावर ताफा थांबवताच पोलिसांनी अतीक बसलेल्या व्हॅनला घेराव घातला. येथे देखील अतीक बैचन झाल्याच दिसलं. मात्र पुन्हा एकदा गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आर्धा तास ताफा इथे थांबला, अतिक व्हॅनमध्येच बसलेला होता. यावेळी या ताफ्याच्या मागे शेकडो गाड्या चालत होत्या.

अतिक अहमद याला त्याचं इन्काटर होईल अशी भीती लागून राहीली होती. याबद्दल साशंकता व्यक्त केल्यानंतर युपी पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात त्याला प्रयागराजपर्यंत पोहचवलं. अतिकचे कुटुंबीय देखील त्यांच इन्काटर होईल असा संशय व्यक्त करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT