atyachar atyachar
देश

भावासमोर बहिणीवर बलात्कार अन् बहिणीने उचलला टोकाचा पाऊल

दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता मी उठलो तेव्हा बहीण अंथरुणावर नव्हती

सकाळ डिजिटल टीम

रात्री जेवण केल्यानंतर बहीण-भाऊ झोपले होते. पहाटे पाच वाजता बहीण अंथरुणावर नव्हती. भावाने बाहेर बघितले असता दोघं जण तिच्यावर बलात्कार करीत (Atrocities on the girl) होते. विरोध केला असता एकाने भावाला पकडून ठेवले. बलात्कार झाल्यानंतर बहिणीने गळफास लावून आत्महत्या (Suicide by hanging) केली. ही घटना मध्य प्रदेशातील (madhya pradesh) छतरपूर जिल्ह्यातील चांदला पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

आठ जानेवारीला बहीण नेहमीप्रमाणे जेवण करून झोपली. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता मी उठलो तेव्हा बहीण अंथरुणावर नव्हती. मी घराबाहेर पडलो तेव्हा नीरज पटेल बहिणीवर जबरदस्ती करीत (Atrocities on the girl) होता. दुसरा छोटा पटेल त्याला मदत करीत होता. मी आरडाओरडा केल्यावर त्यांनी मला पकडले. त्यानंतर कशी तरी बहिणीने तिथून पळ काढला आणि घरात गळफास लावून आत्महत्या (Suicide by hanging) केली, असे भावाने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सध्या कुटुंबीय पोलिस ठाण्यात आलेले नाही. पोलिस ठाण्यात आल्यास त्यांच्या जबाबाच्या आधारे कारवाई केली जाईल, असे चांदला पोलिस ठाण्याचे प्रभारी अतुल दीक्षित म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT