देश

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी लिहलं आत्मचरित्र; राहुल गांधी करणार प्रकाशन

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई: तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन २८ फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याहस्ते होईल. उंगलील ओरूवन असे आत्मचरित्राचे नाव आहे. तुमच्यातलाच एक असा या तमीळ शब्दांचा अर्थ आहे. या कार्यक्रमास जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वीप्रसाद यादव आदी मान्यवर उपस्थित राहतील. (Rahul Gandhi)

नामवंत कवी-गीतकार वैरामुथू, अभिनेते सत्यराज, यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामवंतांना आमंत्रित करण्यात आले आहे. स्टॅलिन यांचा जन्म १९५३ मध्ये झाला. पहिल्या खंडात त्यांनी आयुष्यातील १९७६ पर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. त्यांनी सांगितले की, शालेय, महाविद्यालयीन जीवन, राजकारणातील प्रवेश, विवाह तसेच आणीबाणीचा खडतर कालखंड याविषयी मी लिहिले आहे.

विशी-पंचविशीपर्यंतच्या वाटचालीमधील क्षणांना उजाळा देताना मला आपले नेते, त्यांचे धोरण याविषयी अभिमान वाटतो. त्याचवेळी पक्षाने प्रगती करण्यासाठी केलेला संघर्ष पाहून मी भावुक होतो, असंही एमके स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : जळगावात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू जन्य साठ्यावर कारवाई

SCROLL FOR NEXT