Kothari brothers who hoisted saffron on Babri 
देश

Ayodha Ram Mandir: बाबरीवर भगवा फडकवणारे कोठारी बंधू कोण होते? रस्त्यावर मारण्यात आली होती गोळी

Kothari brothers who hoisted saffron on Babri: राम मंदिराच्या उभारणीसाठी हिंदूंना संघर्ष करावा लागला. यात काहींना आपला जीव देखील गमवावा लागला. यात कोठारी बंधूंचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अयोध्येमध्ये अखेर राम मंदिराचे लोकार्पण होणार असून राम लल्लाची प्रतिष्ठापणा होणार आहे. २२ जानेवारी हा दिवस संपूर्ण देश एका उत्सवाच्या स्वरुपात पाहात आहे. दाव्यानुसार, १५२८ मध्ये मंदिर तोडून या ठिकाणी मशीद बांधण्यात आली होती. त्यामुळे पाचशे वर्षानंतर पुन्हा याठिकाणी राम मंदिर होत असल्याची लोकांची समाधानाची भावना आहे. (Ayodha Ram Mandir Who were the Kothari brothers who hoisted saffron on Babri and died)

राम मंदिराच्या उभारणीसाठी हिंदूंना संघर्ष करावा लागला. यात काहींना आपला जीव देखील गमवावा लागला. यात कोठारी बंधूंचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कोलकात्तामधील दोन भावांनी पहिल्यांदा बाबरी वर १९९० मध्ये भगवा फडकवला होता. या घटनेनंतर तीन दिवसांनी त्यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. कोठारी बंधू कोण होते हे जाणून घेऊया.

कोण होते कोठारी बंधू?

रामकुमार कोठारी (२२ वर्ष) आणि शरद कोठारी (२० वर्ष) दोघे सख्खे भाऊ होते. ते कोलकात्ताच्या बडा बाजार येथे राहायचे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. १९९० मध्ये त्यांनी राम मंदिर आंदोलनात कारसेवा करण्याचा निर्णय घेतला होता. याकाळात मोठ्या संख्येने तरुण कारसेवेसाठी पुढे आले होते. देशात राम मंदिर आंदोलन तीव्र होत होतं.

बहिणीचे लग्न काही दिवसांवर असताना अयोध्येत आले

कोठारी बंधू कारसेवेसाठी तयार झाले होते. पण, त्यांच्या बहिणीचे लग्न काही दिवसांवर आले होते, त्यामुळे वडिलांनी त्यांना थांबवलं. मात्र, लगेच परत येतो असं सांगत त्यांनी अयोध्येकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण, ते कधी परत आले नाहीत. २२ ऑक्टोबरला रात्री कोलकात्तामधून रेल्वेने ते वाराणसीमध्ये आले. काही काळ टॅक्सीने प्रवास केल्यानंतर आजमगढच्या फूलपूरपासून त्यांनी पायी प्रवास सुरु केला.२०० किलोमीटर चालल्यानंतर ते अयोध्येत आले.

बाबरीवर भगवा फडकवला

कोठारी बंधू ३० ऑक्टोंबरला वादग्रस्त जागेठिकाणी पोहोचले. अयोध्येमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. यावेळी लाखोंच्या संख्येने कारसेवक आले होते. माहितीनुसार, जवळपास ५ हजार कारसेवक वादग्रस्त जागेठिकाणी पोहोचले होते. यावेळी कोठारी बंधू पुढाकार घेत बाबरी घुमटावर चढले आणि त्यावर भगवा झेंडा फडकावला.

गोळीबारात मृत्यू

२ नोव्हेंबर १९९० साली विनय कटियार यांच्या नेतृत्वात कारसेवक हनुमान गढीकडे जात होते. यादरम्यान पोलिसांनी गोळीबार सुरु केला. अनेक कारसेवकांनी तेथील घरांचा आश्रय लपण्यासाठी घेतला. त्यात एका भावाला पोलिसांनी रस्त्यावर असताना गोळी मारली. त्याला वाचवण्यासाठी दुसरा भाऊ आला , तेव्हा त्याला देखील गोळी मारण्यात आली. दोन्ही कोठारी बंधूंना अयोध्येच्या रस्त्यांवर मृत्यू आला. गोळीबाराच्या प्रकरणात मुलायम सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT