Ram Mandir 
देश

राम मंदिराच्या भूमीपूजनाची तारीख ठरली? वाचा सविस्तर बातमी

सकाळ वृत्तसेवा

अयोध्या - अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. मंदिराच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेला होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार का याबाबत सस्पेन्स कायम आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अध्यक्षांचे उत्तराधिकारी महंत कमल नयन दास यांनी सांगितलं होतं की, ट्रस्टचे अध्यक्ष गोपाल दास यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून भूमी पूजनासाठी आमंत्रण दिलं आहे. मात्र पंतप्रधान उपस्थित राहणार की नाही याबद्दल कोणतीच अधित माहिती देण्यात आलेली नाही. 

महंत कमल नयन दास यांनी आधीच सांगितलं होतं की, श्रावण महिन्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी भूमी पूजन करण्याचा ट्रस्टचा मानस आहे. तरीही मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात कधी होणार हे ठरवलेलं नाही. याचा निर्णय शनिवारी दुपारी होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल. मंदिर निर्मिती समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा या बैठकीला उपस्थित असणार आहे. 

नृपेंद्र मिश्रा यांच्यासह बीएसएफचे माजी महासंचालक आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे सुरक्षा सल्लागार केके शर्मासुद्धा अयोध्येत पोहोचले आहेत. याशिवाय जे इंजिनिअर्स मंदिराच्या उभारणीचे काम पाहणार आहेत तेदेखील अयोध्येत आहेत. राम मंदिराचे मॉडेल तयार करणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांच्यासह त्यांचा मुलगा निखिल सोमपुरासुद्धा अयोध्येत आले असून दोघेही बैठकीला उपस्थित राहू शकतात.

मंदिराच्या बांधाकामाला सुरुवात करण्याच्या तारखेवरून बरेच अंदाज लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या भूमी पूजनाची तारीख बैठकीत ठरवली जाण्याची शक्यता आहे. राम मंदिर ट्रस्टची बैठक 18 जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं होतं. यामध्ये जमीनी सपाट केल्यानंतर पुढच्या तयारीवर चर्चा होणार आहे. अयोध्या राम मंदिराच्या निर्मितीच्या कामावर देखरेख करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष मंहत गोपाल दास हे आहे. तसंच पंतप्रधानांचे माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा, केंद्रीय अतिरिक्त गृह सचिव ज्ञानेश कुमार आणि उत्तर प्रदेश सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांचा सदस्यांमध्ये समावश आहे. बैठकीत मंदिराच्या उभारणीला सुरुवात करण्याचा मुद्दा महत्वाचा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

SCROLL FOR NEXT