ayodhya mosque to be better than the taj mahal says official muhammad bin abdullah masjid pune connection  
देश

Ayodhya Mosque : ताजमहलपेक्षाही भारी असणार आहे अयोध्येतील मशीद; पुण्याशी आहे खास नातं

अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या मशिदीचे थेट कनेक्शन महाराष्ट्र आणि पुण्याशी देखील आहे, या मशिदीत अनेक खास गोष्टी उभारल्या जाणार आहेत.

रोहित कणसे

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. राम मंदिरापाठोपाठ अयोध्येतील धन्नीपूर येथे 'मोहम्मद बिन अब्दुल्ला' ही भव्य मशीद देखील बांधण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे या मशीदीचे कनेक्शन थेट महाराष्ट्र आणि त्यातही पुणे शहराशी आहे. या मशिदीचे डिझाइन पुण्यातील आर्किटेक्ट इम्रान शेख यांनी तयार केलं आहे. तसचे या मशिदीच्या बांधकामावर देखरेखीची जबाबदारी देखील महाराष्ट्रातील भाजप नेते हाजी अरफात शेख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिरापाठोपाठ या मशिदीच्या बांधकामासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन (IICF) या मशिदीच्या बांधकामावर देखरेख ठेवत आहे. मात्र निधीची कमतरता आणि प्रशासकीय उशिर यामुळे मशिदीचे काम अद्याप रखडले आहे. दरम्यान आता मशिदीच्या बांधकामासाठी पुन्हा जोरात प्रयत्न सुरु केले जात आहेत.

मशिद डेव्हलपमेंट कमिटीचे प्रमुख पद हे महाराष्ट्रातील भाजप नेते हाजी अरफात शेख यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. शेख यांची नियुक्ती गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये करण्यात आली आहे. त्यांनी सध्या या भव्य मशिदीच्या बांधकामासाठी आवश्यक पुढाकार घेण्यास सुरूवात केली आहे.

मशीद ताजमहाल पेक्षा भारी बांधणार

शेख यांनी सांगितलं की, यापूर्वी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आर्किटेक्चर फॅकल्टीचे फाउंडर डीन प्रो.एस.एम. अख्तर यांच्या प्लॅनमध्ये या मशीदीत 4,500 स्क्वेअर मीटरमध्ये हॉस्पिटल, कम्युनिटी किचन, लायब्ररी आणि संशोधन केंद्र यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र आता बांधण्यात येणारी ही मशीद भारतातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी असणार आहे. इतकेच नाही तर ही मशीद ताजमहाल पेक्षा चांगली असेल आणि यामध्ये जगातील सर्वात मोठे 21 फूटांचे कुराण उभारण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

झिरो-कार्बन-फूटप्रिंट डिझाइनबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पूर्वीची डिझाइन हे अंड्याच्या कवचासारखी दिसत होतं, आणि मशिदीसारखे अजिबात नव्हतं. पुढे ते म्हणाले की, पुण्यातील आर्किटेक्ट इम्रान शेख यांनी तयार केलेले नवीन डिझाइन हे फेब्रुवारीच्या अखेरीस तयार होईल. या नव्या मशिदीत हॉस्पिटल आणि कम्युनिटी किचन पुर्वीप्रमाणेच ठेवले जाणार आहे, मात्र इतक काही असतील असे शेख यांनी सांगितलं.

तसेच ही पाच मिनार असलेली भारतातील पहिली मशीद असणार आहे असेही त्यांनी सांगितले . इतकेच नाही तर यामध्ये वॉटर अँड लाइट शोचेही नियोजन देखील करण्यात येणार आहे. मशिदीतील दिवे सूर्यास्ताच्या वेळी सुरू होतील आणि सूर्योदयाच्या वेळी आपोआप बंद होतील. तसेच तरुणांसाठी दुबईपेक्षाही मोठे फिश एक्वेरियम देखील बांधले जाईल असेही शेख म्हणाले.

या मशिदीसाठी अयोध्येपासून 25 किमी अंतरावर धन्नीपूर येथे, फेब्रुवारी 2020 मध्ये पाच एकर भूखंड देण्यात आला होता. येथे रमजाननंतर 2024 च्या उत्तरार्धात मशिदीचे बांधकाम सुरू होईल असे शेख यांनी सांगितलं. तसेच या बांधकामावेळी कुराणमधी काही ओळी लिहीलेली एक वीट सौदीमधील मदिना आणि संपूर्ण भारतातील प्रमुख दर्ग्यांमध्ये फिरवली जाईल आणि ती शेवटी ती मशिदीच्या साइटवर ठेवली जाईल असेही त्यांनी सांगतले.

मशिदीच्या बांधकामापूर्वी विशेष गाणी देखील रेकॉर्ड केली जात आहेत. शेख म्हणाले की, बिग बॉस या टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेला व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट विजय विक्रम सिंग, मशिदीशी संबंधित शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे. यामुळे मशिदीबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहचवली जाईल. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजात असेच व्हिडीओ बनवण्याचा विचार राम मंदिर निर्माण समिती देखील करत आहे.

अयोध्येत मशीद बांधण्यासाठी उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने स्थापन केलेल्या IICF चे अध्यक्ष झुफर अहमद फारुकी यांनी शेख यांची नियुक्ती केली आहे . त्यांना आयआयएफसीमध्ये विश्वस्त आणि गेल्या वर्षी सल्लागार म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष शेख यांनी मशिदीच्या नावावर देखील आक्षेप घेतला आहे, त्यांनी मशिदीचे नाव मस्जिद-ए-अयोध्या बदलून मुहम्मद बिन अब्दुल्ला मस्जिद असे ठेवले आहे.

शेख यांनी स्पष्ट केले की, आयआयएफसी देणग्यांसाठी घरोघरी जाणार नाही, परंतु फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला एक वेबसाइट सुरू करण्यात येईल, ज्यामध्ये सोप्या पद्धतीने देणगी देण्यासाठी क्यूआर कोड देण्यात येतील.

अयोध्या हा भारतातील सर्वात मोठा विषय आहे आणि मंदिर आणि मशीद या दोन्हींच्या उभारणीमुळे समाजातील तणाव संपुष्टात येईल. अयोध्या हे गंगा-जमुनी तहजीबचे उत्कृष्ट उदाहरण बनेल याची आम्ही काळजी घेऊ असेही शेख यांनी सांगितलं. तसेच अयोध्या मशीद प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाईल जेणेकरून राम मंदिर पाहण्यासाठी येणारा प्रत्येकजण मशिदीला भेट देईल असेही शेख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT