Ayodhya Ram Temple Esakal
देश

Ayodhya Ram Temple: 'भगवान राम आमचे पैगंबर...', अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी आलेल्या मुस्लिम रामभक्तांचे पाणावले डोळे

Ayodhya Ram Temple: रामनगरीत हिंदूच नव्हे तर मुस्लिम रामभक्तही दिसत होते. लखनऊहून मोठ्या संख्येने मुस्लिम रामभक्त रामलल्लाचा जयजयकार करत अयोध्येत पोहोचले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. रामाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो लोक येत आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या विविधतेतील एकतेचे अनोखे चित्र अयोध्येत पाहायला मिळाले. रामनगरीत हिंदूच नव्हे तर मुस्लिम रामभक्तही दिसत होते. लखनऊहून मोठ्या संख्येने मुस्लिम रामभक्त रामलल्लाचा जयजयकार करत अयोध्येत पोहोचले.

जानेवारी महिन्यात अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिराचे उद्घाटन झाल्यापासून रामभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. येथे दररोज लाखो राम भक्त प्रभूचे दर्शन घेण्यासाठी येतात. या दरम्यान मंगळवारी मुस्लिम समाजातील रामभक्तांचा मोठा लोंढा लखनऊहून अयोध्येला पोहोचला.

राम मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक अयोध्येत पोहोचत आहेत. 23 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत सुमारे 20 लाख लोक येथे दर्शनासाठी आले आहेत. त्यामुळेच रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला राम मंदिर दर्शनाची वेळ वाढवावी लागली आहे.

अशातच मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या बॅनरखाली मुस्लिमांचा एक गट अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी आला. प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम रामभक्त कबीर मठातून बाहेर पडले आणि मुख्य मार्ग रामपथमार्गे भक्तिमार्गावर आले. यावेळी सर्वजण जय श्री राम आणि वंदे मातरम् असा जयघोष केला.

अयोध्येत जाती-धर्माच्या भिंती तोडून प्रेम, एकता आणि सौदार्हाचे दृश्य पाहायला मिळाले. रामलल्लाच्या दर्शनासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांनी आम्ही भारताचे रहिवासी आहोत. या देशात हिंदू असो, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, सर्व एक आहेत. रामलल्लाचे दर्शन घेऊन सर्वधर्म समभावाचा संदेश देणे हा आपल्या सर्वांचा उद्देश आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

राम नगरीत भाविकांच्या आगमनासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. राहण्याची आणि जेवणाची सोय येथे केली जाते. मंदिर समितीला अवघ्या सात दिवसांत 5 कोटी 60 लाख रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 22th Installment : खुशखबर! 'या' तारखेला येणार PM किसानचा 22 वा हप्ता; पण 'ही' एक चूक केल्यास पैसे जातील परत

उंच इमारत, १०२० खाटा, अत्याधुनिक सुविधा... मुंबईतील 'हे' मोठे रुग्णालय आधुनिक सुपर-स्पेशालिटी केंद्र बनणार, वाचा ५७३ कोटींचा मेगा प्रकल्प

₹1,67,00,00,000 ची संपत्ती! 100 कोटींच्या घराचा मालक पण 50 व्या वर्षीही अविवाहित; अभिनेता जगतोय एकटं आयुष्य

Latest Marathi News Live Update : "रोजगार द्या, चॉकलेट नको!" नागपुरात युवा प्रशिक्षणार्थींचा तीव्र मोर्चा

Mumbai News: पुराच्या संकटावर कायमचा तोडगा! महापालिकेने आखली नवी योजना; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT