Viral News esakal
देश

Viral: 'कुणी तरी येणार येणार गं!' पोलीस ठाण्यातच 'डोहाळे जेवण'

एखाद्या पोलीस ठाण्यात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तुम्ही कधी पाहिला आहे का? सोशल मीडियावर त्या बातमीची मोठी चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Good News Viral: घरगुती डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आपण पाहिला आहे, त्यात सहभाग घेतला आहे. हल्ली मोठ्या सेलिब्रेशन हॉलमध्ये देखील तो कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. मात्र एखाद्या पोलीस ठाण्यात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तुम्ही कधी पाहिला आहे का, सध्या सोशल मीडियावर त्या आगळ्या वेगळ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

भोपाळ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी असणाऱ्या करिश्मा राजावत यांच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चाही आहे. त्या ग्वालिएरच्या राहणाऱ्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी चाईल्ड लिव्ह साठी अर्ज केला होता. त्यांना एक सरप्राईज गिफ्ट म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. न्युज 18 नं प्रसिद्ध केलेल्या या वृत्तानुसार, भोपाळ मधील पोलीस ठाण्यात आकर्षक सजावट करण्यात आली होती.

पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अंजना धुर्वे यांनी याविषयी सांगितलं की, बाकीच्या सर्व स्टाफनं करिश्माच्या डोहाळे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात सर्वजण सहभागी झाले होते. त्यामध्ये 25 महिला कर्मचाऱ्यांनी तिच्या बहिणीची, मैत्रीणीची आणि नातेवाईकांची भूमिका पार पाडली. तर 13 पुरुष अधिकाऱ्यांनी तिच्या माहेरची माणसं म्हणून भूमिका निभावली. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. तासभर चाललेल्या त्या कार्यक्रमाला सर्वांची साथ मिळाली.

पहिल्यांदाच पोलीस ठाण्यामध्ये अशाप्रकारे एखादा कार्यक्रम पार पडला असेल. सध्या सोशल मीडियावर देखील त्याची चर्चा आहे. केवळ भोपाळमध्येच नाही तर पूर्ण मध्य प्रदेशात अशा प्रकारचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम यापूर्वी कधी पार पडलेला नाही. अनेकांनी त्याचे कौतूकही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT