Ban on use of mobile phones in temples esakal
देश

मंदिरांत प्रवेश करण्यापूर्वी 'ही' काळजी घ्या, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान; धर्मादाय खात्यानं दिलाय महत्वाचा आदेश

Mobile Ban In Temples : मंदिरांच्या (Temple) आवारात सध्या मोबाईलचा (Mobile) अतिरेक झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मोबाईल वापरावर निर्बंध घातल्याबाबत मंदिर प्रशासनांनी भाविकांना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. यासाठी मंदिरामध्ये यापुढे ठराविक सूचना फलक लावण्यात यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.

बेळगाव : मंदिरांच्या (Temple) आवारात सध्या मोबाईलचा (Mobile) अतिरेक झाला आहे. मोबाईलमधून सेल्फी काढणे, फोटो काढणे, मोठ्या आवाजात संभाषण करणे, व्हिडिओ काढणे आदी कारणांमुळे पुजारी तसेच मंदिरात येणाऱ्या अन्य भाविकांना त्रास होत आहे.

देवदर्शन करताना त्यांची एकाग्रता भंग होत आहे. या सर्वांची दखल धर्मादाय खात्याने घेतली आहे. त्यानुसार यापुढे धर्मादाय खात्याच्या अखत्यारितील सर्व मंदिरांमध्ये मोबाईल वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

बेळगावातील दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर (Kapileshwar Temple), टिळकवाडी येथील श्री साई मंदिर, अनगोळ येथील श्री हरी मंदिर, समादेवी गल्ली येथील श्री समादेवी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना आपले मोबाईल 'स्वीच ऑफ' करणे अनिवार्य ठरणार आहे. धर्मादाय खात्यातर्फे सोमवारी (ता. १७) यासंबंधी अधिकृत आदेश जाहीर केला आहे.

या आदेशानुसार बेळगावसह तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज मंदिर, सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा मंदिर, रायबाग तालुक्यातील चिंचली मायाक्का मंदिर, हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री येथील होळेम्मा देवी मंदिरांचा समावेश आहे. या मंदिरात जाणाऱ्या भाविकांना यापुढे आपला मोबाईल बंद ठेवावा लागणार आहे.

मोबाईल वापरावर निर्बंध घातल्याबाबत मंदिर प्रशासनांनी भाविकांना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. यासाठी मंदिरामध्ये यापुढे ठराविक सूचना फलक लावण्यात यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना शांततापूर्वक देवदर्शन करण्याची सूचना करावी, अशा सूचना धर्मादाय खात्याकडून मंदिर प्रशासनाला करण्यात आली आहे.

धर्मादाय खात्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. श्री कपिलेश्वर देवस्थानात ट्रस्टतर्फे या आधीच मंदिर परिसरात मोबाईल वापरावर निर्बंधाबाबत सूचना फलक लावण्यात आलेला आहे. यापुढे मुख्य प्रवेशद्वारावर मोबाईल निर्बंधाबाबत फलक उभारण्यात येणार आहे.

- अभिजित चव्हाण, सहसचिव, श्री कपिलेश्वर देवस्थान ट्रस्ट, बेळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Nagpur Rural Development: ७९ वर्षांनंतरही स्वातंत्र्य आहे कुठे?; स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही मूलभूत सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू, स्वातंत्र्यदिन कार्यालयातच साजरा

SCROLL FOR NEXT