banana google
देश

वाढत्या उष्णतेमुळे केळ्याचे उत्पादन धोक्यात

उष्णता वाढल्याने केळ्याच्या उत्पादनामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

नमिता धुरी

मुंबई : देवासमोर अगरबत्ती टोचण्यापासून ते शारीरिक ऊर्जा प्राप्त करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत केळ्याचा वापर होतो; मानवी आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या या केळ्याचे अस्तित्त्व आता धोक्यात आले आहे. बदलत्या हवापाण्याचा परिणाम केळ्यावर होत आहे.

केळ्याचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते; मात्र केळ्याची सर्वात जास्त शेते तमिळनाडूमध्ये आहेत. त्या खालोखाल कर्नाटकचा क्रमांक लागतो. केळ्यामध्ये पोटॅशिअम आणि पॅक्टीन आढळते. यामुळे मज्जासंस्था बळकट होते. तसेच पांढऱ्या पेशी आणि बी ६ जीवनसत्त्वही वाढीस लागते.

खाद्य आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार २०१० ते २०१७ या कालावधीत केळ्याचे देशातील वार्षिक उत्पन्न २९ दशलक्ष टन इतके होते. त्यात आता हळूहळू घट होत आहे. जगभरातील केळ्यांच्या उत्पादनात २९ टक्के वाटा भारताचा आहे. भविष्यात त्याचे प्रमाण कमी होऊ शकते. सरकार उष्णकटिबंधीय शेतीकडे फारसे लक्ष देत नसल्यामुळे भारत केळ्याच्या उत्पादनात मागे पडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंग्लंडच्या एक्सेटर विद्यापीठाने केळ्याच्या उत्पादनावर होणाऱ्या हवामानातील बदलाच्या परिणामाचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार १९६१नंतर २७ देशांमध्ये अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने केळ्याच्या उत्पादनात वाढ झाली. केळ्याच्या जागतिक उत्पादनात या देशांचा ८६ टक्के वाटा आहे. आता आणखी एक अभ्यास नेचर क्लायमेट चेंजमध्ये प्रकाशित झाला आहे.

नव्या अभ्यासानुसार हवापाण्यामध्ये सतत बदल होत राहिला तर २०५०पर्यंत केळ्याचे उत्पादन कमी होऊ शकते. भारत, ब्राझील, कोलंबिया, कोस्टारिका, ग्वाटेमाला, पनामा आणि फिलीपिन्स या देशांमधील केळ्याच्या उत्पादनात मोठी घट दिसून येतील.

उष्णता वाढल्याने केळ्याच्या उत्पादनामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर केळ्याचे संपूर्ण उत्पादन खराब होऊ शकते. पनामा विल्ट फ्यूजेरियम विल्ट टीरआर-2 या नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव सध्या केळ्यावर वाढत आहे. या बुरशीमुळे केळ्याच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळू लागतात व खोडही कुजू लागते. या रोगावर अद्यापही रामबाण उपाय ठरू शकेल असे औषध तयार होऊ शकलेले नाही. त्यामुळे उष्णता वाढत राहिल्यास केळ्याचे अस्तित्त्व धोक्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT