Police personnel deployed inside Banaras Hindu University campus after violent clashes and stone pelting between student groups in Varanasi.
esakal
Clash Erupts Between Student Groups at Banaras Hindu University : वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) गुरुवारी मोठ्याप्रमाणात राडा झाल्याचे समोर आले आहे. दोन वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात दगडफेक झाली. यामुळे विद्यापीठ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार यामध्ये एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे विद्यापीठा परिसरात नजर ठेवली जात आहे.
याबाबत काशी झोनचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) गौरव बन्सल यांनी माहिती दिली आहे की, आज झालेल्या गोंधळामागे जन्माष्टमीच्या दिवशी रुईया हॉस्टेल आणि बिर्ला हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये झालेला वाद असल्याचे समोर आले आहे.
तसेच दोन विद्यार्थी गटांमध्ये आपापसात हाणामारी झाली. आम्हाला दगडफेकीची देखील माहिती मिळाली. मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला आणि हाणामारी करणारे विद्यार्थी पळून गेले. जखमी विद्यार्थ्याला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.अशीही माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.