Bangalore Bomb Blast Case esakal
देश

Bangalore Bomb Blast : रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट; चार संशयित ताब्यात, महत्त्वाच्या ठिकाणी हाय अॅलर्ट, तपास CBI कडे

बंगळूर शहर पोलिस आयुक्त बी. दयानंद (B. Dayanand) यांनी या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सीसीबीकडे (CBI) हस्तांतरित करण्याचा आदेश जारी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कॅफेमध्ये बॉम्ब ठेवताना व्यक्तीच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. संशयित आरोपीच्या चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर टोपी आहे.

बंगळूर : शहराला हादरवून सोडणाऱ्या व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी (Bangalore Bomb Blast Case) शहर पोलिसांनी (Karnataka Police) चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कटात दहशतवाद्यांचा सहभाग आहे की नाही, याबाबत सखोल चौकशी सुरू केली आहे. या घटनेसंदर्भात केवळ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बंगळूर शहर पोलिस आयुक्त बी. दयानंद (B. Dayanand) यांनी या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सीसीबीकडे (CBI) हस्तांतरित करण्याचा आदेश जारी केला आहे. बॉम्बस्फोटाबाबत एचएएल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीसीबीकडे सोपवला असून तपास अधिकारी म्हणून अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीन कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारे अनेक पोलिस पथके विविध अंगांनी चौकशी करत होते. सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद टोपी घातलेल्या व्यक्तीलाही काल रात्री ताब्यात घेऊन चौकशी केली. बॉम्बस्फोट झाल्यानंतर लगेचच सीसीबी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. टोपी घातलेल्या व्यक्तीसह एकूण चार जणांना अटक केली. त्यांची अज्ञात स्थळी चौकशी सुरू आहे. संशयितांनी घातपाताचा कट रचल्याची माहिती आहे. संपूर्ण घटनेदरम्यान बोटांचे ठसे कोठेही राहू नयेत, यासाठी त्याने हातमोजे घालून कॅफेत शिरला आणि तसाच निघून गेला.

बॅगेत स्फोटके

संशयित बसमधून खाली उतरला आणि घाईघाईने जात होता. आरोपी साईड बॅग घेऊन आला होता. त्या बॅगेत आणखी एक बॅग होती. त्यातून त्याने स्फोटके आणल्याचे आणखी एका सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दृश्य पोलिसांना उपलब्ध झाले आहे. लोकांच्या नजरेत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात न दिसणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन शेवटी तो वॉश बेसिनच्या शेजारी असलेल्या कचरा कुंडीत बॅग ठेवून निघून गेला.

महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट

बॉम्बस्फोटानंतर राज्याच्या विविध भागांत पोलिस हाय अलर्टवर आहेत. बंगळूर शहरातील बस आणि रेल्वे स्थानकांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय राज्यातील सर्व बस आणि रेल्वे स्थानकांवर सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना रेल्वे स्थानकांवर संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बंगळूरसह राज्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे. परिवहन महामंडळाच्या स्थानकावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

‘तो’ सीसीटीव्हीत कैद

कॅफेमध्ये बॉम्ब ठेवताना व्यक्तीच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. संशयित आरोपीच्या चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर टोपी आहे. त्याच्या संशयास्पद हालचालींची नोंद केली आहे. तो शुक्रवारी ११.५० वाजता कॅफेच्या बाहेर पडला. बीएमटीसी बस स्टँड रामेश्वरम कॅफेच्या अगदी समोर आहे. तेथील बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयिताचा व्हिडिओ कैद झाला आहे.

एफआयआर नोंद

बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एचएएल स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी १२.५५ वाजता रामेश्वर कॅफेमध्ये स्फोट झाला. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून, एकूण दहा जण जखमी झाले आहेत. एनएसजी बॉम्बशोधक पथकाने ही कारवाई तीव्र केली असून, स्फोट झालेल्या ठिकाणाची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT