Terrorists Arrested News Terrorists Arrested News
देश

Terrorists Arrested : बांगलादेशी दहशतवादी संघटनेच्या १२ जिहादींना अटक

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी : आसाम पोलिसांनी बांगलादेशस्थित (Bangladesh) अन्सारुल इस्लाम या दहशतवादी (Terrorists) संघटनेशी संबंधित १२ जिहादींना अटक केली आहे. एक दिवसापूर्वी आसाम पोलिसांनी स्लिपर सेलचा भंडाफोड केला होता. तो बांगलादेशी दहशतवाद्याला घरात आश्रय देत होता. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अनेक ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

अन्सारुल इस्लाम या दहशतवादी (Terrorists) संघटनेची मुळे अनेक देशांमध्ये पसरलेली आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशच्या (Bangladesh) सीमेवरून भारतात घुसून दहशतवादी भारताच्या विविध राज्यांत पोहोचतात, असे अलीकडेच अहवालात म्हटले आहे. दहशतवादी संघटनांनी अनेकवेळा असे प्रयत्न केले आहेत. मात्र, यंत्रणांच्या कडकपणामुळे त्यांचे हेतू साध्य होत नाहीत.

आसाममधील (assam) अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिस आणि सुरक्षा दल सक्रिय आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर लगेच कारवाई केली जाते. आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांत बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये सर्वाधिक घुसखोरी झाली आहे. मोठ्या प्रमाणात घुसखोरही पकडले आहेत.

दहशतवादी मॉड्यूलचाही पर्दाफाश

आसाम पोलिसांनी मोरीगावमध्ये दहशतवादी मॉड्यूलचाही पर्दाफाश केला आहे. येथील एका मदरशात जिहादी कारवाया केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. येथून एका संशयित जिहादीला अटक करण्यात आली असून, मुफ्ती मुस्तफा असे त्याचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

SCROLL FOR NEXT