esakal

देश

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Tarique Rahman Reverses Yunus' Decisions : अंतरिम सरकारच्या काळात घेतलेले अनेक निर्णय उलटवले ; छळवणुकीच्या अनेक प्रकरणांची पुन्हा चौकशी केली जाणार

Mayur Ratnaparkhe

Bangladesh PM Tarique Rahman orders : बांगलादेशचे पंतप्रधान झाल्यानंतर, तारिक रहमान यांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात घेतलेले अनेक निर्णय उलटवले आहेत. सोमवारी बांगलादेशचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी छळवणुकीच्या घटना रोखण्यासाठी ५ ऑगस्ट २०२४ नंतर दाखल केलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्याचे आदेश दिले.

विद्यार्थी चळवळीमुळे अवामी लीग सरकार पडल्यानंतर दाखल झालेल्या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याचे आणि निष्पाप व्यक्तींना छळ सहन करावा लागू नये, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, सलाहुद्दीन अहमद यांनी संचालनालये आणि कायदा अंमलबजावणी संस्थांच्या प्रमुखांसोबत तीन तासांची बैठक घेतली.

ते म्हणाले, "५ ऑगस्ट २०२४ नंतर काही लोकांनी वैयक्तिक फायद्यासाठी व्यापारी आणि पत्रकारांसह विविध व्यवसायातील लोकांना लक्ष्य केले." कायद्याचे राज्य स्थापित करण्यासाठी पोलिसांना या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याचे आणि सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यांनी स्पष्ट केले की कोणत्याही परिस्थितीत झुंडशाही सहन केली जाणार नाही. सलाहुद्दीन अहमद यांनी भर दिला की, "महामार्ग रोखण्याची किंवा मागण्यांसाठी हिंसाचाराचा वापर करण्याची पद्धत आता संपली आहे. आता कायदेशीर आणि संस्थात्मक मार्गांनी तक्रारी मांडल्या पाहिजेत." तसेच, मागील सरकारच्या कारकिर्दीचा संदर्भ देत सलाहुद्दीन अहमद म्हणाले की, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस दलावर गंभीर परिणाम झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT