Strike Sakal media
देश

बँक संपामुळे 38 लाख 'चेकमेट'; 37 हजार कोटींचे व्यवहार ठप्प

कृष्ण जोशी

मुंबई : बँक खासगीकरणाच्या (Bank Privatization) विरोधात देशातील बँक कर्मचाऱ्यांनी (bank employee strike) केलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे देशभरात 37 हजार कोटी रुपयांच्या 38 लाख धनादेशांचे व्यवहार (crore rupees transaction problems) ठप्प झाले. उद्यापासून बँकांचे काम सुरु होईल. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनतर्फे (United Forum of Bank Unions) या संपाची हाक देण्यात आली होती. देशातील सर्वच सरकारी बँका तसेच काही छोट्या खासगी व परदेशी बँकांचे कर्मचारीही यात सहभागी झाले होते. काही सरकारी बँकांमध्ये फक्त वरिष्ठ अधिकारी कामावर होते, मात्र कर्मचारी नसल्याने त्यांनाही फारकाही काम करता आले नाही.

या संपामुळे देशभरातील एक लाख बँक शाखांचे काम बंद होते, त्यामुळे ग्राहकांची मोठीच गैरसोय झाली. देशात चेन्नै, दिल्ली व मुंबई येथे चेक क्लिअरिंग सेंटर असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 15 हजार 400 कोटी रुपयांचे 18 लाख धनादेश वठणे लांबणीवर पडले. दिल्लीत 11 हजार कोटी रुपयांचे 11 लाख धनादेश तर चेन्नैत 10 हजार 600 कोटी रुपयांचे 10 लाख चेक वठले नाहीत.

उद्या तिसरा शनिवार असल्याने बँका अर्धा दिवस काम करतील. त्यामुळे सोमवारपासूनच खऱ्या अर्थाने बँकांचे कामकाज सुरु होईल. बँक खासगीकरणाचे विधेयक सध्या संसदेसमोर चर्चेसाठी आहे. ते संमत झाल्यास बँक खासगीकरणाचे वारे वाहू लागतील, त्यामुळे अंतिमतः ठेवीदारांचे व नागरिकांचे नुकसान होईल, अशी भीती कर्मचारी संघटनांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT