rahul gandhi. 
देश

'...ही देशाच्या आर्थिक सुरक्षेसोबत तडजोड'; बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला राहुल गांधींचा पाठिंबा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संपावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी या संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राहुल गांधींनी ट्विट करत असा दावा देखील केलाय की, सरकार लाभाचे खासगीकरण आणि नुकसानीचे राष्ट्रीयकरण करत आहे. राहुल गांधींनी ट्विट केलंय की, केंद्र सरकार लाभाचे खासगीकरण आणि नुकसानीचे राष्ट्रीयकरण करत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना कॉर्पोरेट्सना विकणं म्हणजे भारताच्या आर्थिक सुरक्षेसोबत तडजोड करण्यासारखं आहे. 

सध्या दोन सरकारी बँकाच्या खासगीकरणाविरोधात बँकेचे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे सध्या बँकेचे कामकाज ठप्प झाले आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 15 आणि 16 मार्च रोजी संपाचं आवाहन केलं आहे. या युनियनने दावा केलाय की जवळपास 10 लाख बँक कर्मचारी तसेच अधिकारी या संपामध्ये सामील झाले आहेत. राज्यसभेत देखील या मुद्यावर चर्चा झाली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी या मुद्यावरुन प्रश्न विचारले आहेत. तसेच यावर उपाय काढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना उत्तर देण्याची मागणी केली. 

त्यांनी म्हटलं की, देशात जवळपास 12 राष्ट्रीयकृत बँक आहेत तसेच यांच्या एक लाखभर शाखा आहेत. यामध्ये जवळपास 13 लाख लोक काम करत आहेत आणि 75 कोटीहून अधिक खातेदार आहेत. यातील कुणालाही न विचारता सरकारने खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. 2008 मध्ये जेंव्हा जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट आलेलं तेंव्हा राष्ट्रीयकृत बँकांमुळेच अर्थव्यवस्था तगली होती. आज बँकेचे लाखो कर्मचारी रस्त्यावर आहेत तर त्यांच्या समस्येला अर्थमंत्र्यांनी वाचा फोडायला हवी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT