मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारसाठी निषेध मोर्चे किंवा निदर्शने हा भाग फारसा नवीन नाही. २०१४पासून पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला अनेक वेळा सामन्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात सरकारी संस्थांचे खाजगीकरण हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. अनेक सरकारी संस्थांमध्ये खाजगी कंपन्यांना गुंतवणूक करण्याचे आवाहन मोदी सरकारकडून केले जात आहे. बँकिंग क्षेत्रातही खाजगीकरण होत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. अशा वेळी आता बँकांच्या खाजगीकरणाविरोधात मार्च महिन्यात मास्कच्या माध्यमातून अनोखा निषेध व्यक्त केला जाणार आहे.
महत्त्वाची बातमी : "महाविकास आघाडी सरकारचा नवीन स्कॅम अलर्ट", आशिष शेलार यांनी केलं खळबळजनक ट्विट
बँकिंग क्षेत्रातील विविध संघटना आणि अधिकारी वर्गांच्या संघटना मिळून १५ आणि १६ मार्चला बँकिंग कामकाज बंद ठेवून बँकिंग क्षेत्रातील खाजगीकरणाविरोधात अनोखा निषेध व्यक्त करणार आहेत. करोनाचा काळ असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर एकत्र जमण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत बँकेतील कर्मचारी खाजगीकरणाचा विरोध एका वेगळ्याच प्रकारे करणार आहेत. 'खाजगीकरण थांबवा' (stop privatization) असा संदेश लिहिलेले मास्क बँकेत येणाऱ्या खातेधारकांना दिले जाणार असून त्या माध्यमातून निषेध व्यक्त केला जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय, सरकारी बँका आणि खाजगी बँकांच्या कार्यपद्धतीतील आणि सेवा पुरवणाच्या दरातील तफावतदेखील समजावून सांगितली जाणार आहे.
महत्त्वाची बातमी : ...तर मुंबईतील लग्न सोहळ्यांमध्ये निमंत्रणाशिवाय धडकेल BMC पथक
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या देशाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दोन सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे मार्च महिन्यात अनेक बँक संघटनांनी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. १३ मार्चला दुसरा शनिवार तर १४ मार्चला रविवार असल्याने बँकांना सुटी आहे. त्यानंतर १५ आणि १६ मार्चला संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे बँका सलग चार दिवस बंद राहणार असून ग्राहक आणि खातेधारकांचे हाल होऊ नयेत यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाईल असं बँक संघटनांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाची बातमी : मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी SIT, गृहमंत्र्यांची घोषणा
बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा संप झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यादेखील संप पुकारणार असल्याची माहिती अखिल भारतीय राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांच्या फेडरेशनचे स्टेट सेक्रेटरी निलेश पवार यांनी दिली. बँकांचे विलीनीकरण होताना केवळ कर्मचारी वर्गाकडूनच निषेध नोंदवण्यात येत होता. पण आता आम्हाला सामान्य नागरिकांचाही पाठिंबा मिळताना दिसतो आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
Banking Staff strike against privatisation unique way to protest giving mask to customers with stop privatisation message
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.