rajsthan google
देश

पाण्यासाठी संघर्ष! जवळची विहीर २५ किलोमीटर अंतरावर

मार्च महिन्यात येथील जलस्त्रोत आटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी 25 ते 30 किमीचा प्रवास करावा लागतोय

सकाळ डिजिटल टीम

मार्च महिन्यात येथील जलस्त्रोत आटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी 25 ते 30 किमीचा प्रवास करावा लागतोय

सध्या मान्सूनचे देशात आगमण झाले असले तरी राजस्थानमध्ये उन्हाचा तडाखा कायम आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील बारमेर जिल्ह्यातील एका गावातून वेगळी बातमी समोर येत आहे. या गावातील ग्रामस्थांना यंदा तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागत आहे.

अशा कडक उन्हाळ्यात वाळवंटाच्या मधोमध साडेचारशे वर्षे जुन्या असणाऱ्या बछिया गावातील रहिवासींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मार्च महिन्यात येथील जलस्त्रोत आटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी 25 ते 30 किमीचा प्रवास करावा लागत आहे. या परिसरातील विहीरही कोरडी झाल्याने निम्म्यापेक्षा अधिक लोकांनी त्यांच्या पशुंसह स्थलांतर केले आहे.

यासंबंधित अधिकची माहिती अशी की, मार्चमध्येच या गावातील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने पाण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. पाण्याच्या उपलब्धतेसाठी गावकऱ्यांना 25 किमीची पायपीट करावी लागत आहे. असे असले तरीही अत्यावश्यक कामांसाठी पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गावकऱ्यांसाठी जवळचा जलस्रोत म्हणून गेराब ग्रामपंचायत आहे मात्र, ती 25 किमी अंतरावर आहे.

याशिवाय मायाजदार ग्रामपंचायत 35 किमी अंतरावर आहे. या दोन्ही ठिकाणी केवळ दोन कूपनलिका असून, त्या संबंधित विभागाकडे आहेत. स्थानिकांना प्राधान्य असल्याने बछिया येथील रहिवाशांना पाणी मिळत नाही. येथील लोक पाण्याच्या एकमेव समस्येसाठी भांडत नाहीत तर इतरही अनेक कारणे ग्रामस्थांच्या अडचणीत वाढ करत असल्याचे सांगितले जाते. वातावरणातील बदलासोबत बऱ्याच समस्या समोर येत आहेत.

गेल्या ५ वर्षात येथे काही टोळींचे हल्लेही वाढले आहेत. वाळू माफियांचा येथील ग्रामस्थांना त्रास होत असतो. वारंवार येणाऱ्या वादळांमुळे दिवस रात्रीत बदलतो आणि घरातून बाहेर पडणे अशक्य होते. अशा परिस्थितीत जलसंकट असताना येथे लोकांचा दुहेरी संघर्ष सुरू आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत येथील लोक पाण्यासाठी झगडत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT