Aishwarya Shoyorain 
देश

ब्यूटी विथ ब्रेन : मॉडेल पहिल्याच प्रयत्नात बनली IAS अधिकारी

जाणून घ्या ऐश्वर्या श्योराणचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवेत सहभागी होणं अर्थात IAS होणं हे सोपं काम नाही. यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार युपीएससी परीक्षेसाठी अर्ज करतात. पण यांपैकी काही टक्केच लोक ही परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी ठरतात. या परीक्षेला देशातील सर्वात अवघड परीक्षा मानलं जातं. पण तरीही आपलं पॅशन ज्यांना स्वस्थ बसू देत नाही ते दिवस-रात्र अभ्यास करुन यश खेचून आणतात. इतर क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनाही आयएएस होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नाही. अशाच एका व्यक्तीची गोष्ट आपण आज पाहणार आहोत. या व्यक्तीची ओळख 'ब्यूटी विथ ब्रेन' अशीच करावी लागेल. कारण ती एक हुशार आणि सुंदर मॉडेल असून पहिल्याच प्रयत्नात तिनं आपल्या बुद्धीच्या आणि पॅशनच्या जोरावर आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. (Beauty with Brain a model Aishwarya Shyoran became IAS officer in first attempt)

ऐश्वर्या श्योराण असं या मॉडेलचं नाव आहे. ऐश्वर्या ही फेमिना मिस इंडिया या ब्यूटी स्पर्धेतील फायनलिस्ट राहिली आहे. मॉडेलिंग आणि ब्यूटी स्पर्धेशी संबंधीत असलेल्या एका मुलीनं पहिल्याच प्रयत्नात आयएएस बनून मोठं यश मिळवलं आहे. ऐश्वर्याही मुळची राजस्थानची रहिवासी आहे. तिचं कुटुंब पहिल्यापासूनच दिल्ली शहरात राहत होतं. दिल्लीतील चाणक्यपुरीतील संस्कृती स्कूलमधून तिनं शिक्षण घेतलं. पहिल्यापासूनच ती अभ्यास एक हुशार विद्यार्थीनी होती. १२ च्या बोर्डाच्या परीक्षेत ९७.५० टक्के गुण मिळवत ती शाळेत पहिली आली होती. त्यानंतर ऐश्वर्यानं दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी मिळवली. आयएएस बनलेल्या ऐश्वर्याच्या वडिलांचं नाव अजय श्योराण असून ते इंडियन आर्मीमध्ये कर्नल आहेत. तेलंगाणाच्या करीमनगर येथे सध्या ते तैनात आहेत. तिच्या आईचं नाव सूमन असून त्या गृहिणी आहेत. सध्या ऐश्वर्याचं संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झालं आहे.

आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बनली मॉडेल

ऐश्वर्या सुरुवातीपासून अभ्यासात चांगली होती तसेच तिचं कायमच प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न होतं. पण तिच्या आईची इच्छा होती की आपल्या मुलीनं मिस इंडिया बनावं. त्यासाठी आईनं आपल्या लेकीचं नावही माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय हीच्या नावावरुन ऐश्वर्या असं ठेवलं. ऐश्वर्या देखील आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मॉडेलिंगकडे वळली. सन २०१४ मध्ये ऐश्वर्या दिल्लीच्या 'क्लीन अँड क्लिअर फेस फ्रेश' बनली. त्यानंतर सन २०१५ मध्ये तिनं 'मिस दिल्ली'चा किताब पटकावला. यानंतर ऐश्वर्यानं सन २०१६ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेत ती फेमिना मिस इंडिया २०१६ मध्ये २१ वी फायनलिस्ट ठरली. तिनं आपल्या आईसाठी या टप्प्यापर्यंत पोहोचून दाखवलं. पण आता तिचं स्वतःच स्वप्न पूर्ण करणंही बाकी होतं. त्यानंतर ती आयएएसच्या तयारीला लागली.

कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाली ऐश्वर्या

सन २०१८ मध्ये ऐश्वर्याने युपीएससीची तयारी सुरु केली. यासाठी तिनं १० महिने घरातच अभ्यास केला. कोणत्याही कोचिंगशिवाय तिनं पहिल्याच प्रयत्नात १० महिन्यात तिनं यश मिळवलं. युपीएससी ऑल इंडिया रँकमध्ये तिला ९३ वा रँक मिळाला. त्यानंतर अशा प्रकारे एक मॉडेल राहिलेली ऐश्वर्या आयएएस अधिकारी बनली. दरम्यान, ऐश्वर्या श्योराणची आयआयएम इंदोरमध्ये देखील निवड झाली होती. पण तिनं इथं प्रवेश घेतला नाही. तिनं आपलं पूर्ण लक्ष्य प्रशासकीय सेवेवर केंद्रीत केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT