beirut 
देश

Bairut Blast : भारतातही बैरूतसारख्या स्फोटाचा धोका

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई - लेबनॉनची राजधानी बैरुतला असुरक्षितपणे ठेवलेल्या अमोनियम नायट्रेटमुळे मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी झालेल्या स्फोटात 135 लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून त्या ठिकाणी अमोनियम नायट्रेटचा 2750 टन इतका प्रचंड मोठा साठा ठेवण्यात आला होता. एका जहाजातून आलेलं हे अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं. बैरुत दुर्घटनेनंतर आता भारतातही अशा धोकादायक अमोनियम नायट्रेटचा मोठा साठा असल्याचं समोर आल्यानं चिंता वाढली आहे. 

तामिळनाडुची राजधानी चेन्नईच्या बाहेर कस्टम विभागाने गेल्या काही वर्षांपासून जवळपास 740 टन अमोनियम नायट्रेटचा साठा केला आहे. याबद्दल आता चिंता व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमोनियम नायट्रेट मोठ्या प्रमाणावर भारतातील फटाक्यांची मोठी इंडस्ट्री शिवकाशीमधील एका ग्रुपला पाठवण्यात येत होता. तेव्हा 2015 मध्ये चेन्नई बंदरात हा साठा जप्त केला होता. तेव्हापासून अमोनियम नायट्रेट तसंच गोदामात पडून आहे. 

कस्टम विभागाकडून अमोनियम नायट्रेट असल्याचा दावा केला जात असताना चेन्नई बंदराच्या अधिकाऱ्यांनी मात्र स्फोटकांचा असा साठा बंदरात नसल्याचं म्हटलं आहे. जनसंपर्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, जवळपास 36 कंटनेर असून त्या प्रत्येकामध्ये 20 टन अमोनियम नायट्रेट आहे. हा साठा बऱ्याच काळापासून हलवण्यात आला असून सध्या तो सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात आहे.

कस्टम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विभागाकडे 690 टन अमोनियम नायट्रेट आहे. त्याच्या साठ्याबाबत आणि एकूण सुरक्षिततेसाठी काम सुरु आहे. याची माहिती लवकरच देण्यात येईल. 

बैरुत स्फोटांचा दाखला देत अण्णाद्रमुकचे सहकारी पक्ष पीएमकेचे प्रमुख डॉक्टर रामदास यांनी अमोनियम नायट्रेटची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची आणि इतर उत्पादने तयार करण्यासाठी काळजी घेऊन वापर व्हावा अशी मागणी केली आहे. रामदास यांनी ट्विट केलं की, चेन्नईतील वेअरहाउसमध्ये अमोनियम नायट्रेटमुळे स्फोट होण्याचा धोका आहे. हे रोखण्यासाठी अमोनियम नायट्रेटसह स्फोटक पदार्थांची सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावायला हवी. खत निर्मितीसारख्या इतर कामांसाठी त्याचा वापर केला जावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT