Marathi-English Hoardings esakal
देश

म. ए. समितीचा विरोध डावलून कन्नड संघटनांच्या दबावापुढं महापालिका झुकली; मराठी-इंग्रजी भाषेतील हटविले होर्डिंग्ज

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने न्यायालयाच्या आदेशासह त्या मोहिमेला विरोध केला होता.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या आठवड्यात कन्नड संघटनांकडून चन्नम्मा चौकातील काही इंग्रजी भाषेतील होर्डिंग्ज हटविले होते.

बेळगाव : बेळगाव शहरातील मराठी व इंग्रजी भाषेतील फलक (Marathi and English Board) व होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम महापालिकेने (Belgaum Municipality) सुरू केली आहे. शनिवारी सायंकाळी एकाचवेळी शहराच्या दोन्ही भागांत ही मोहीम सुरू केली. शहराच्या दक्षिण भागात या मोहिमेला होर्डिंग्ज ठेकेदारांनी विरोध केल्याची माहिती मिळाली; पण विरोध डावलून महापालिकेकडून होर्डिंग्ज हटविले.

आयुक्त अशोक दुडुगंटी यांच्या आदेशावरून ही मोहीम हाती घेतली; पण या मोहिमेचे पडसाद बेळगावात उमटण्याची शक्यता आहे. याआधीही धर्मवीर संभाजी महाराज चौकातील (Dharmaveer Sambhaji Maharaj Chowk) मराठी भाषेतील फलक हटविण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली होती.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने न्यायालयाच्या आदेशासह त्या मोहिमेला विरोध केला होता. त्यामुळे ती मोहीम थांबविण्याची नामुष्की महापालिकेवर ओढविली; पण आता कन्नड संघटनांच्या (Kannada Organizations) दबावामुळे महापालिकेने पुन्हा ही मोहीम सुरू केली आहे. मात्र, या मोहिमेला पुन्हा विरोध होण्याची शक्यता आहे. शनिवारी शहराच्या उत्तर भागात जिल्हा रुग्णालयाजवळील एपीएमसी कॉर्नर येथील तीन होर्डिंग्ज हटविले. तर शहराच्या दक्षिण भागात गोवावेस, टिळकवाडी भागातील होर्डिंग्ज व फलक हटविले.

उत्तर विभागात महसूल व अतिक्रमण निर्मलून विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबविली. दक्षिण विभागात महसूल विभागाने मोहीम राबविली; पण या मोहिमेमुळे जाहिरात कर वसुलीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचे मात्र मोठे नुकसान होणार आहे. होर्डिंग्जवर कन्नडऐवजी मराठी व इंग्रजी मजकूर ठळकपणे नमूद केल्याची कन्नड संघटनांची तक्रार आहे. गेल्या आठवड्यात कन्नड संघटनांकडून चन्नम्मा चौकातील काही इंग्रजी भाषेतील होर्डिंग्ज हटविले होते. त्यानंतर होर्डिंग्जवर ६० टक्के जागेत मजकूर कन्नड भाषेत हवा, या मागणीसाठी आंदोलनही सुरू केले होते.

या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्त दुडगुंटी यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील मराठी व इंग्रजी भाषेतील होर्डिंग्ज व फलक हटविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यामुळे महापालिका आयुक्तांचे कन्नडप्रेम ठळकपणे अधोरेखीत झाले आहे. बेळगावात मराठी भाषिक बहुसंख्येने आहेत. त्यामुळे जाहिरात फलक किंवा होर्डिंग्जवर मराठीचा वापर ठळकपणे केला जातो. मराठी-कन्नड वाद टाळण्यासाठी अनेकांकडून केवळ इंग्रजी भाषेचा वापर केला जातो.

व्यापारी उद्देशाने लावले फलक

गोवा व महाराष्ट्रातून बेळगावात खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे व्यावसायिक उद्देशाने लावलेल्या फलकांवर, होर्डिंग्जवर मराठी व इंग्रजीचा वापर आधीपासूनच केला जातो; पण मूठभर कन्नड कार्यकर्त्यांच्या दबावामुळे मराठी व इंग्रजी भाषेतील फलकांवर कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT