Belgaum Ethanol Production Nitin Gadkari esakal
देश

Nitin Gadkari : भविष्यात बेळगाव जिल्हा बनणार इथेनॉल उत्पादनाचे हब; मंत्री नितीन गडकरींची माहिती

बेळगाव जिल्ह्यातील मोठे ऊस उत्पादन पाहिल्यास भविष्यात बेळगाव इथेनॉल उत्पादनाचे हब (Belgaum Ethanol Production) होऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव शहरात उड्डाणपूल, गोकाक धबधबा हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.

बेळगाव : ऊस पीक आता केवळ साखर उत्पादनासाठी मर्यादित राहिले नाही. उसाद्वारे इथेनॉल (Ethanol) उत्पादन मोठ्या स्वरुपात घेतले जात आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील मोठे ऊस उत्पादन पाहिल्यास भविष्यात बेळगाव इथेनॉल उत्पादनाचे हब (Belgaum Ethanol Production) होऊ शकते. त्यासाठी कर्नाटक राज्य शासनाकडून व्यापक प्रयत्न अपेक्षित असल्याचे केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यातील १,६२२ कोटी रुपये खर्चून होनगा-झाडशहापूर चौपरी रिंगरोड, ९४१ कोटी रुपये खर्चून चिक्कोडी बायपास ते गोटूर चौपदरी रस्ता, शिरगुप्पी ते अंकलीपर्यंत ८८७ कोटी रुपये खर्चून तर रस्त्याचे रुंदीकरण असे मिळून १३ हजार कोटी रुपये खर्चून ६८० किलोमीटर लांबीच्या रस्ता कामांना गुरुवारी (ता. २२) गडकरी यांनी चालना दिली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा क्रीडांगणावर हा कार्यक्रम झाला.

बेळगावातील रिंगरोड (Belgaum Ring Road) संदर्भात कित्येक वर्षांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आता त्याची वेळ जुळून आली आहे. बेळगावातील बायपास रस्त्यामुळे बेळगाव ते गोवा आणि बेळगाव-हुनगुंद-रायचूर या महामार्गामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. बेळगाव ते संकेश्‍वर महामार्गाला वन विभागाची वेळेत अनुमती न मिळाल्यामुळे काम रखडले आहे. राज्य सरकारने यातील अडथळे दूर करून कामाला चालना द्यावी, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.

मंत्री गडकरी म्हणाले, ‘‘देशभरातील ग्रीन कॉरिडॉर महामार्गाच्या विकासाला केंद्र सरकार प्राधान्य देत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. पर्यावरणपूरक महामार्गाची निर्मिती होईल. बेळगावात ऊस उत्पादन जादा घेतले जाते. उसापासून इथेनॉल निर्मितीमुळे अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. इथेनॉल उत्पादन वाढविले आणि इथेनॉल पंप सुरु केल्यास वाहनधारकांना केवळ साठ रुपयांत इंधन मिळू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल. शेतकरी आणि पर्यावरणाचे संवर्धन होईल.

यामुळे राज्य सरकारने बेळगाव जिल्ह्यात इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. काही दिवसांत भारत जगाला इथेनॉल निर्यात करेल. भविष्यात इथेनॉल व मिथेनॉलवर आधारित वाहने रस्त्यावर आणून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासह पर्यावरण संवर्धनावर भर दिला जाईल.’’ यावेळी यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, खासदार मंगला अंगडी यांची भाषणे झाली. खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार अभय पाटील, विठ्ठल हलगेकर, प्रकाश हुक्केरी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा उपस्थित होते.

पालकमत्र्यांतर्फे गडकरींबाबत गौरवद्‍गार

बेळगाव शहरात उड्डाणपूल, गोकाक धबधबा हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे. राज्यातील सर्वच प्रकल्पांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून भविष्यामध्ये असेच सहकार्य दिल्यास विकासाचा वेग वाढेल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. गडकरी यांच्या नि:पक्षपातीपणामुळे राज्यातील रस्त्यांच्या विकासाला गती मिळत आहे, असे गौरवद्‍गार त्यांनी काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT