Parth Chaterjee Sakal
देश

West Bangal : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीकडून पार्थ चॅटर्जींना अटक

ईडीच्या छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांनी चॅटर्जी यांच्या जवळच्या सहकाऱ्याकडून 20 कोटींची माया जप्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

West Bangal Teachers Recruitment Case : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. चटर्जी यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

TMC नेत्याच्या मैत्रिणीकडून 20 कोटी जप्त

पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ED ने शुक्रवारी रात्री टीएमसी पक्षाचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची मैत्रीण अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले. यादरम्यान 20 कोटींहून अधिक रोकड, विदेशी चलन आणि सोने इत्यादी जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच छापेमारीत अनेक गुन्हे दाखले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेले हे पैसे एसएससी घोटाळ्याशी निगडीत असल्याचा संशय ईडीला आहे. कारवाईच्या काही मिनिटांनंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी "ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.. असे म्हणत पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे.

छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये पश्चिम बंगालचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी, माजी शिक्षण मंत्री परेश अधिकारी, पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन शिक्षण मंत्री आमदार माणिक भट्टाचार्य यांचा समावेश आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. एसएससी घोटाळा झाला तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते.

काय आहे शिक्षक भरती घोटाळा?

पश्चिम बंगाल सरकारच्या मंत्र्यांवर करण्यात येत असलेली ही संपूर्ण कारवाई शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये नापास उमेदवार लाखो रुपयांची लाच देऊन उत्तीर्ण झाले. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना लवकरच अटक केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT