Great Indian Sleep Scorecard 
देश

Great Indian Sleep Scorecard: झोपण्यापूर्वी तुम्ही मोबाईलला चिकटता? सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा...

Sandip Kapde

बंगळुरू: बंगळुरू मधील  बहुतेक  लोक त्यांच्या मोबाइलचा अविभाज्य भाग झाले आहेत. अलीकडील एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की ९१ टक्के लोक झोपण्यापूर्वी अंथरुणावर मोबाईलचा वापर करतात. तसेच ३८ टक्के लोकांनी झोपून सोशल मीडिया ब्राउझ केला. याशिवाय कामावरून काढून टाकल्याबद्दल चिंतेत असलेल्या यापैकी २९ टक्के लोक निद्रानाशाचे बळी ठरले आहेत. 

फेब्रुवारी २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत बंगळुरू आणि उर्वरित देशामध्ये मॅट्रेस निर्माता वेकफिटने केलेल्या 'ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड' अंतर्गत झोपेच्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे. सर्वसमावेशक सर्वेक्षणाच्या सहाव्या आवृत्तीत १० हजार हून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला. ज्यामध्ये बेंगळुरूमधील विविध वयोगटातील ४ हजार लोकांच्या झोपेचे नमुने घेण्यात आले आहेत. 

१३  महिन्यांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ६१ टक्के लोक रात्री ११ नंतर झोपतात. तर झापेसाठी योग्य वेळ रात्री १० वाजता मानली जाते. तसेच उशिरा झोपूनही बंगळुरूतील २९ टक्के लोक सकाळी ७ ते ८ या वेळेत जागे झाले. त्याच वेळी ६० टक्के लोकांना कामाच्या दरम्यान झोप येते. सुमारे ३४ टक्के लोकांना सकाळी फ्रेश वाटत नाही. 

विशेष म्हणजे ३२ टक्के असे लोक होते जे बेड व्यतिरिक्त इतर ठिकाणी झोपतात. दरम्यान, ४० टक्के लोकांनी सांगितले की बेडरुमच्या वातावरणाचा त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. तर २० टक्के लोकांचा असा विश्वास आहे की चांगल्या बेडमुळे त्यांची झोप सुधारली आहे. आणि २६ टक्के लोकांना असे वाटले की ते निद्रानाशाने ग्रस्त झाले आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस (NIMHANS) येथील क्लिनिकल सायकॉलॉजीचे प्राध्यापक आणि सर्व्हिसेस फॉर हेल्दी युज ऑफ टेक्नॉलॉजी (SHUT) क्लिनिकचे समन्वयक डॉ. मनोज कुमार शर्मा यांच्या मते, प्रौढ व्यक्तीला दिवसातून ६ ते ७ तासांची झोप लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT