Crime Sakal
देश

सेक्स करताना व्यक्तीचा मृत्यू; महिलेने पतीच्या मदतीने लावली मृतदेहाची विल्हेवाट, पण...

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू - बंगळुरुमधील रस्त्याच्या कडेला सापडलेल्या 67 वर्षीय वृद्धाच्या मृतदेहाबाबत करण्यात आलेल्या तपासात धक्कादायक सत्य समोर आलं आहे. वृद्धाचा मृत्यू मोलकरणीसोबत सेक्स करताना झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी माहिती दिली. ( Man Dies During Sex news in marathi)

पोलिस तपासात असे दिसून आले की, मोलकरणीने तिचा नवरा आणि भावाच्या मदतीने, मृत व्यक्तीचा मृतदेह चादर आणि प्लास्टिकने गुंडाळून त्याची विल्हेवाट लावली. केवळ अटक होण्याच्या भीतीने हा प्रकार केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी नगर येथील रहिवासी बालसुब्रह्मण्यम यांचा मृतदेह 17 नोव्हेंबर रोजी रस्त्याच्या कडेला सापडला होता. पोलीस तपासाला सुरुवात केल्यानंतर तो एक दिवस आधीच घरातून निघून गेल्याचं निष्पन्न झालं होते. आपल्या नातवाला बॅडमिंटनच्या प्रॅक्टीससाठी सोडल्यानंतर मृत वृद्धाने कुटुंबातील सदस्यांना फोन करून घरी यायला उशीर होईल असं सांगितलं होतं. मात्र ते घरी न परतल्याने अखेरीस पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

दरम्यान मृत व्यक्ती आपली प्रेयसी जी की त्याची मोलकरणी होती, तिच्या घऱी गेला होता. आपल्या प्रेयसीशी सेक्स करताना अचानक सुब्रमण्यम यांच्या छातीत दुखू लागलं. त्यातच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मोबाईल लोकशनच्या माध्यमातून घटनेचा छडा लावला. गेल्या वर्षीच मृत व्यक्तीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT