rajnath singh esakal
देश

Rajnath Singh : स्वदेशी एरो-इंजिनच्या निर्मितीचे कार्य अवघड, पण अशक्य नाही

भारताने जगाला योग, गणित व भौतिकशास्त्रतील 'पाय', शून्य तसेच कित्येक प्रमेये दिले आहेत. वर्षानुवर्षे केलेले संशोधन आणि प्रयोगातून या गोष्टी साध्य झाल्या.

अक्षता पवार

भारताने जगाला योग, गणित व भौतिकशास्त्रतील 'पाय', शून्य तसेच कित्येक प्रमेये दिले आहेत. वर्षानुवर्षे केलेले संशोधन आणि प्रयोगातून या गोष्टी साध्य झाल्या.

बंगळूर - भारताने जगाला योग, गणित व भौतिकशास्त्रतील 'पाय', शून्य तसेच कित्येक प्रमेये दिले आहेत. वर्षानुवर्षे केलेले संशोधन आणि प्रयोगातून या गोष्टी साध्य झाल्या. त्याच प्रमाणे संशोधन आणि प्रयोह्मगातून स्वदेशी एरो इंजिनसाठी आवश्यक तंत्रज्ञान निर्मितीवर भर देण्याची गरज आहे. असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

एरो इंडियामध्ये मंगळवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वतीने विकसित करण्यात आलेल्या १८ तंत्रज्ञानांना खासगी उद्योगांना हस्तांतरित करण्यात आले. यामध्ये पुण्यातील आर अँड डीई आणि शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (एआरडीई) या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. ही प्रक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आर अँड डीईच्या टी ७२/ टी ९० या रणगाड्यांसाठी ट्रॉल असेंब्ली हे तंत्रज्ञान बीईएमएल लिमिटेड, बंगळूर आणि इलेक्ट्रोन्यूमॅटिक्स आणि हायड्रोलिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या दोन उद्योगांना हस्तांतरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर एआरडीईच्या शस्त्र शोध प्रणालीचे तंत्रज्ञान अहमदाबादच्या ग्लोबलटेक इंडिया प्रा.ली या कंपनीला देण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्र सक्षम करण्यामागे डीआरडीओ मोलाची भूमिका पार पाडत आहे. आपल्या संशोधन आणि इनोव्हेशन्स मुळे देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. क्षेपणास्त्रे, शस्त्रास्त्र प्रणाली तसेच वाहने अशा विविध गोष्टींमध्ये डीआरडीओने आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे एरो-इंजिनच्या निर्मितीच्या दिशेने तुम्ही यश मिळवू शकत नाही असे कोणतेही कारण नाही. हे अवघड असले तरी अशक्य नाही. असेही नमूद करत त्यांनी डीआरडीओला या प्रयोगासाठी प्रोत्साहित केले.

भारतच्या संरक्षण क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञान व उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करत मोठ्या संख्येने उत्पादनांची निर्मिती करणे आणि वेळेत या उत्पादनांना सशस्त्र दलाना पुरविण्यासाठी खासगी उद्योगांना सहभागी करण्यात येते. त्याच अनुषंगाने हे तंत्रज्ञान खासगी उद्योगांना हस्तांतरित केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT