Apps 
देश

चीनच्या या 52 ॲप्सपासून सावध राहा

पीटीआय

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यात वाद सुरू असल्याने भारतीय नागरिक चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत. यादरम्यान भारतीय गुप्तचर संस्थेने भारत सरकारला चीनचे ५२ मोबाईल ॲप्स ब्लॉक करण्याचे आणि त्याचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुप्तचर संस्थेच्या मते, चीनचे हे ५२ ॲप्स सुरक्षित नसून, ॲप्स वापरणाऱ्याचा डेटा भारताबाहेर संग्रहित केला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखील हे ॲप्स धोकादायक आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, सध्याच्या काळात गुप्तचर संस्थेने केलेल्या शिफारशींवर राष्ट्रीय सुरक्षा परिषद सकारात्मक विचार करत आहे. यावर आतापर्यंत निर्णय घेतला नसला तरी, राष्ट्रीय सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे नमूद केले. चीनची ही ॲप्स देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे गुप्तचर संस्थेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

चीनचे वादग्रस्त ॲप्स

  • टिकटॉक, वॉल्ट हाइड, विगो व्हिडिओ, बिगो लाइव्ह वेबिबो
  • वुई चॅट, शेअरइट, यूसी न्यूज, यूसी ब्राऊजर
  • ब्यूटी प्लस, झेंडर, क्लब फॅक्टरी, हॅलो, लाइक
  • कवाई, रोमवुई, शिन, न्यूजडॉग, फोटो वंडर
  • अप्यूस ब्राऊजर, विवा व्हिडिओ, क्यूयू व्हिडिओ इंक
  • परफेक्ट कॉर्प्स, सीएम ब्राऊजर, व्हायरस क्लिनर
  • एमआय कम्युनिटी, डीयू रेकॉर्डर, युकॅम मेकअप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

Kalyan Kale: ‘राहुल गांधींवर टीका करण्याची फडणवीसांची उंची नाही’; खासदार कल्याण काळेंचा मुख्यमंत्र्यांना पलटवार

Pune News: नव्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले; बांधकामाला पाणी मारताना कैलास बेनके यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Maharashtra Drought: दुष्काळाची घोषणा कागदावर नको, शेतकऱ्यांच्या खात्यात मदत द्या; दीपिका चव्हाण यांचा सरकारकडे आग्रह

SCROLL FOR NEXT