bhagwant mann and arvind kejrival sakal
देश

चामकूर साहिबला धडकले केजरीवाल, मान; मतदारसंघात शेतकऱ्यांशी संवाद

आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी चामकूर साहिब मतदारसंघात काही शेतकऱ्यांशी संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

चंडीगड : आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwval)आणि प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी चामकूर साहिब मतदारसंघात काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा मतदारसंघ पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा आहे. (Punjab Election Updates)

शुक्रवारी आपतर्फे एक व्हिडिओ जारी करण्यात आला. त्यानुसार मोहरीच्या शेतात खाटेवर बसून हे दोघे काही शेतकऱ्यांसह चर्चा करीत असल्याचे दिसून येते. उसाच्या पिकाचा मोबदला मिळाला का, असे मान यांनी शेतकऱ्यांना विचारले. त्यावर ही रक्कम अद्याप मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

त्या भागातील अनेक युवक बेरोजगार असल्याची माहितीही या नेत्यांना देण्यात आली. त्यावर केजरीवाल यांनी, यावेळी तुम्ही बदल घडवून आपला सत्तेवर आणणार आहात का, असा प्रश्न विचारला.

दिल्लीतील शाळा, रुग्णालय अशा सुविधांची माहिती आहे का, या केजरीवाल यांच्या प्रश्नालाहोकारार्थी उत्तर मिळाले. तुमच्या भागात सरकारी शाळा आहे का, या प्रश्नावर, तेथे शाळा आहे, पण १२ शिक्षकांची गरज असताना केवळ पाच जण नियुक्त असल्याची माहिती देण्यात आली.

आप सत्तेवर आल्यास सर्व सरकारी शाळा दिल्लीप्रमाणे सुसज्ज केल्या जातील, युवकांना रोजगार देण्यात येईल, असे केजरीवाल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोन्या चांदीला झळाळी ते इंधन पुरवठा सुरळीत! युद्धविरामाचा भारताला काय होणार फायदा?

IPL 2026: वैभव सूर्यवंशी भविष्यातील मुंबई इंडियन्सचा खेळाडू... RR vs MI सामन्यानंतर कोणी केला हा दावा? कसं आहे शक्य?

दीपिकाने धर्म बदलून केलेलं दुसरं लग्न; आता मुलाला नमाज शिकवत आहे अभिनेत्री, भावूक होत म्हणते....

ओमानमध्ये ड्रोन हल्ल्यात मृत्यू, शरीराचे तुकडे; DNA टेस्ट करून पार्थिव कुटुंबाकडे द्या; मुंबई हायकोर्टाचे DDGPला आदेश

Latest Marathi News Live Update: लातूरमध्ये मद्यधुंद दुचाकीस्वाराने लहान मुलाला उडवले; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

SCROLL FOR NEXT