Bhagwant Mann
Bhagwant Mann 
देश

मुख्यमंत्रीपदासाठी नाव घोषित झाल्यानंतर भगवंत मान म्हणाले...

Amit Ujagare (अमित उजागरे)

मोहाली : आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पक्षाचे खासदार भगवंतसिंग मान (Bhagwant Mann) यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा (Punjab CM) उमेदवार म्हणून भगवंत मान यांची मंगळवारी घोषणा केली. यावर मान यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना आपनं (AAP) माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळं सर्वात आधी आता पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Bhagwant Mann first reaction after being announced for post of Punjab CM)

मान म्हणाले, अडचणीवर मात कशी करायची हे पंजाबच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळं आशा सोडू नका. आपनं माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली असून आधी पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यावेळी आपल्या पंजाबी भाषेत त्यांनी काही काव्यात्मक पंक्तीही म्हटल्या.

आपकडून गेल्या आठवड्यात एक फोन क्रमांक शेअर केला होता. तसेच पंजाबच्या लोकांना आवाहन केलं होतं की, मुख्यमंत्रीपदासाठी तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतो त्याला वोट करा. ज्याला सर्वात जास्त मतं मिळतील तो मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल. यानंतर जनतेनेही याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला, त्यामुळं यासाठी २२ लाख लोकांनी फोनवरुन प्रतिसाद दिला.

केजरीवाल यांच्यामाहितीनुसार, ९३.३ टक्के लोकांनी भगवंत मान यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळं अखेर मान यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब झालं. मान हे सध्या संग्रूर लोकसभा मतदारसंघातून आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT