Bharat Band Esakal
देश

Bharat Band: 21 ऑगस्टला कशामुळे भारत बंद? जाणून घ्या, काय बंद राहणार अन् काय खुले

Bharat Band On 21 August: भारत बंद दरम्यान सार्वजनिक वाहतूक सेवेवर परिणाम होऊ शकतो. याचबरोबर काही ठिकाणी खाजगी कार्यालयांनाही फटका बसू शकतो.

आशुतोष मसगौंडे

एससी/एसटी आरक्षणामध्ये क्रिमी लेयर लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ आरक्षण बचाव संघर्ष समितीने 21 ऑगस्टला म्हणजेच उद्या भारत बंदची घोषणा केली आहे.

अनेक दलित संघटनांनीही भारताला पाठिंबा दिला. याशिवाय बसपनेही भारत बंदला पाठिंबा दिला आहे. कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यास सांगण्यात आले आहे.

भारत बंद का?

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना एससी/एसटी आरक्षणामध्ये क्रिमी लेयर तयार करण्याची परवानगी दिली आहे. ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना आरक्षणात प्राधान्य मिळायला हवे, असे न्यायालयाने म्हटले आहे. भारत बंदची घोषणा करणाऱ्या संघटनांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

कोणत्या सेवा बंद?

भारत बंदबाबत अद्याप कोणत्याही राज्य सरकारने अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. या बंद दरम्यान सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी उपाययोजना करत आहेत.

भारत बंद दरम्यान सार्वजनिक वाहतूक सेवेवर परिणाम होऊ शकतो. याचबरोबर काही ठिकाणी खाजगी कार्यालयांनाही फटका बसू शकतो.

कोणत्या सेवा सुरू?

21 ऑगस्टच्या भारत बंद दरम्यान रुग्णालये आणि रुग्णवाहिका यासारख्या आपत्कालीन सेवा सुरू राहतील. बँक कार्यालये व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही आदेश आलेला नाही. त्यामुळे बुधवारी बँका आणि सरकारी कार्यालयेही सुरू असतील, असे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

रात्रभर नोटा जाळत होता सरकारी इंजिनिअर तरी पैसे शिल्लक, छाप्यात सापडलं मोठं घबाड; कोट्यवधींच्या राखेसह रोकड जप्त

Vitamin D deficiency: व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास त्वचेवर दिसतात 'ही' 4 लक्षणे,करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT