nasal covid-19 vaccine esakal
देश

नाकावाटे दिली जाणारी कोविड-19 लस अंतिम टप्प्यात

धनश्री ओतारी

भारत बायोटेकच्या नाकातून दिल्या जाणाऱ्या कोविड-19 लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. अशी दिलासादायक माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि एमडी डॉ कृष्णा एला यांनी दिली आहे.

डेटा विश्लेषण चालू आहे. आम्ही डेटा नियामक एजन्सीकडे सबमिट करू. सर्वकाही ठीक असल्यास, आम्हाला लॉन्च करण्याची परवानगी मिळेल आणि ही जगातील पहिली नैदानिकदृष्ट्या सिद्ध झालेली कोविड-19 लस असेल. असे कृष्णा एला यांनी म्हटलं आहे.

भारताच्या औषध नियंत्रक जनरल (DCGI) विषय तज्ञ समितीने (SEC) भारत बायोटेकला त्यांच्या इंट्रानासल कोविड लसीसाठी ‘फेज-III बूस्टर डोस स्टडी’ साठी ‘तत्त्वतः’ मान्यता दिली आहे, ही भारतातील याप्रकारची पहिलीच लस आहे.

भारतातील तिसऱ्या डोसच्या फेज-III चाचणीसाठी अर्ज सादर करणारी भारत बायोटेक ही दुसरी कंपनी आहे. इंट्रानासल लसींमध्ये ओमिक्रॉन सारख्या नवीन कोविड-19 प्रकारांचा प्रसार रोखण्याची क्षमता आहे.

भारताने देशात लसीकरणासाठी कोव्हिशिल्ट, कोवॅक्सीन आणि स्पुटनिकला मान्यता दिली आहे. डीसीजीआय आणि डब्ल्यूएचओ आपत्कालीन वापर सूची (WHO EUL) कडून 28-दिवसीय मल्टी-डोस वायल पॉलिसी (MDVP) अंतर्गत वापरण्यासाठी कोवॅक्सीनला मान्यता देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO Listing: जिओच्या शेअरची बाजारात धडाक्यात एंट्री! 21.36% प्रीमियमवर लिस्टिंग; गुंतवणूकदारांना किती फायदा?

Pirangut Ghat Police Road Cleaning : हातात खराटा अन् स्वतः साफ केला रस्ता! पिरंगुट घाटात दिसली RTO पोलिसांची माणुसकी; जीवाची पर्वा न करता वाचवले अनेकांचे प्राण!

सयाजी शिंदेंच्या मुलाला पाहिलंत का? सेम टू सेम कॉपी! वडिलांसोबत मराठी सिनेमातून करणार पदार्पण

Priyanshu Moliya Triple Century : ३७ चेंडूंत १५० धावा... भारताच्या २१ वर्षीय फलंदाजाचे त्रिशतक, ६९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; चेतेश्वर पुजाराच्या पंक्तीत जाऊन बसला

मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पुर्णेकर समर्थकांच्या आंदोलनाचा फटका

SCROLL FOR NEXT