Bharat Jodo Yatra  sakal
देश

Bharat Jodo Yatra : सोनिया, प्रियांका गांधी ‘भारत जोडो’त सहभागी होणार

अखिल भारतीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे सोमवारी म्हैसूर विमानतळावर आगमन

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : अखिल भारतीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे सोमवारी म्हैसूर विमानतळावर आगमन झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो पदयात्रे’त त्या गुरुवारी सामील होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही शुक्रवारी (ता. ७) कर्नाटकात येत असून त्याही पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, एआयसीसी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी म्हैसूरच्या विमानतळावर सोनिया गांधींचे स्वागत केले.

दरम्यान, म्हैसूरहून निघालेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला सोमवारी दुपारी श्रीरंगपट्टण येथे ४ आणि ५ ऑक्टोबरला दोन दिवस विश्रांती दिली आहे. सोनिया गांधी दोन दिवस कोडगू येथे वास्तव्य करतील. सोनिया गांधी गुरुवारी मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर येथे भारत जोडो यात्रेत सामील होतील. प्रियांका गांधी सात ऑक्टोबर रोजी राज्यात येणार असून नागमंगल येथील यात्रेत सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Rates India : २४ तासांत चांदीची चमक २४ हजारांनी उतरली, सोन्याच्या भावामध्ये सहा हजारांची घसरण; आणखी दर पडणार...

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

NCP Party : पुणे निवडणुकीसाठी अखेर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; उमेदवारांना थेट मिळणार एबी फॉर्म

लोकप्रिय अभिनेत्रीनं संपवलं जीवन; अभिनयाच्या दुनियेत मोठं स्वप्न उराशी बाळगलेल्या 'नंदिनी'चा दुर्दैवी अंत, चाहत्यांमध्ये शोककळा

Solapur politics: सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेला गळती; ‘दासरी हटाव’च्या नाऱ्यानंतर दिग्गज नेत्यांचा राजीनामा, ठाकरे सेना बॅकफूटवर!

SCROLL FOR NEXT