Rahul Gandhi On Image Esakal
देश

Bharat Jodo Yatra : ''जो राहुल गांधी तुमच्या डोक्यात आहे, त्याला मी मारलं'' अजब विधानाने गोंधळ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हरियाणामध्ये आहे. काँग्रेसची ही यात्रा म्हणजे राहुल गांधींची इमेज बनवण्यासाठी असल्याचा आरोप नेहमी केला जातो. त्याला आज राहुल गांधींनी त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना इमेज बदलण्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल म्हणाले की, मी असल्या भानगडीत पडत नाही. यात्रेमुळे त्यांची प्रतिमा किती बदलली? या प्रश्नावर त्यांनी नेमकेपणाने उत्तर दिलं.

राहुल गांधी म्हणाले की, राहुल गांधी जो तुमच्या डोक्यात आहे, त्याला मी मारलं आहे. तो माझ्या डोक्यात नाहीये, तो निघून गेला. तुम्ही ज्या माणसाला बघताय, तो राहुल गांधी नाही. फक्त आपल्याला तसं वाटतंय.

हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

''तुम्हाला विश्वास नसेल तर हिंदू धर्म वाचा. शिवजींना वाचा. राहुल गांधी तर तुमच्या आणि भाजपच्या डोक्यात आहे..परंतु माझ्या डोक्यात नाही.''

मला 'इमेज'ची पर्वा नाही- राहुल गांधी

मला माझ्या इमेजची पर्वा नाहीये. तुम्ही जी माझी इमेज बनवणार आहात, तशी बनवा. मला याचा काहीही फरक पडत नाही. मला फक्त माझं काम करायचं आहे. शिवाय माझी प्रतिमा किती बदलली आणि किती नाही, हे तर तुम्हालाच ठरवायचं आहे, असंही राहुल गांधी शेवटी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : विकेंड, होळीमुळे वाहनांची गर्दी, लोणावळ्याजवळ गाड्यांच्या रांगा; संथगतीने वाहतूक

Holi 2026 Skin Care: रंगपंचमीच्या आधी फेशिअल करणे योग्य की धोकादायक? तज्ज्ञ काय सांगतात?

Yeola News : शून्यातून विश्व उभे केले, पण आगीने होत्याचे नव्हते केले; खैरनार कुटुंबावर कोसळले आभाळ

Kolhapur circuit Bench : कोल्हापूर सर्किट बेंचला नवे बळ; दोन महिन्यांत दुसऱ्यांदा न्यायमूर्तींची वाढ

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपाच्या अर्चना पाटील अध्यक्ष होणार?

SCROLL FOR NEXT