Bharat Jodo Yatra haryana esakal
देश

Bharat Jodo Yatra : इतक्या थंडीतही टी-शर्ट घातला.. नेमकं खाता काय? मंत्र्याची अजब टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता हरियाणातून दिल्लीमध्ये प्रवेश करत आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये भारत जोडो यात्रा पोहोचली तेव्हा राहुल गांधी सर्वत्र दिसले ते पांढऱ्या टी-शर्टमध्ये.

याच टी-शर्टवरुन एक वेगळ्या प्रकारची टीका राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली आहे. हरियाणाचे कृषीमंत्री जेपी दलाल म्हणाले की, राहुल गांधींनी देशहितासाठी आर्मीला सांगावे की ते कोणतं औषध घेत आहेत... कारण इतकी थंडी असूनही ते टी-शर्ट घाललायत. याचा फायदा देशाला होईल.

हेही वाचाः Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

कृषीमंत्र्यांच्या या बोचऱ्या टीकेला काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांची यात्रा आता दिल्लीमध्ये दाखल होत आहे. ही यात्रा थांबवावी, यासाठी हरियाणा सरकारकडून राहुल गांधींना पत्र देण्यात आलेलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पत्र दिल्याचं मंत्री जेपी दलाल यांनी सांगितलं. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. एका दिवसामध्ये साडेतीन कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतातदेखील वेळीच उपाययोजना केल्या जात आहेत. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT