Bharat Mandapam All You Need To Know About 
देश

G20 Bharat Mandapam: 'भारत मंडपम' उभारणीसाठी इतिहासातून प्रेरणा; जाणून घ्या 10 खास वैशिष्ट्ये

कार्तिक पुजारी

Bharat Mandapam All You Need To Know About

नवी दिल्ली- जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद यंदा भारताकडे असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जी-२० परिषद 'भारत मंडपम'मध्ये भरवण्यात आली आहे. जगातील सर्वात शक्तीशाली अर्थव्यवस्थांचे प्रमुख भारतातमध्ये एकत्र आले आहेत.

भारत मंडपमबाबत १० खास गोष्टी

1.भारत मंडपमचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ जुलै २०२३ रोजी करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टीकोनातून भारत मंडपमची उभारणी करण्यात आली आहे. यात भारतीय कलेचे प्रदर्शन करण्यात आले आहे.

2.भारत मंडपमची उभारणी २,७०० कोटी रुपये खर्च करुन करण्यात आली आहे.

3.आयईसीसी कॉम्पेक्स हे भारताचे सर्वात मोठ एमआयसीई (मिटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन) केंद्र आहे. हा संपूर्ण भाग १२३ एकरचा आहे.

4.आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी या केंद्राची निर्मिती करण्यात आलीये. यात व्यापार मेळावे, अधिवेशन, परिषद आणि इतर महत्त्वाचे कार्यक्रम घेतले जाऊ शकतात. यात अनेक खोल्या, व्यापार केंद्रे, विश्रामगृहे, सभागृहे आहेत. तसेच तीन हजार लोक बसू शकतील असे एम्पीशिएटर यात आहे.

5.भारत मंडपममध्ये सात हजार लोक बसू शकतील अशी सुविधा आहे. मंडपममध्ये बहुउद्देशीय हॉल आणि इतर काही छोटे हॉल आहेत.

6.भारत मंडपमची रचना शंखाच्या आकाराला डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. मंडपमच्या भिंती आणि समोरील भागावर भारतीय परंपरा आणि संस्कृती दर्शनाची कला दाखवण्यात आलीये.

7.देशातील वेगवेगळ्या भागातील आदिवासी कलाकूसर आणि चित्र यांचे प्रदर्शन परिषदेमध्ये करण्यात आले आहे.

8.परिषदेच्या सर्व भागात ५जी वायफाय सुविधा पुरवण्यात आली आहे. परिषदेमध्ये ५५०० वाहने पार्किंग करता येतील इतकी जागा पुरवण्यात आली आहे.

9.मंडपमध्ये भिंतीवर २६ स्क्रीन बोर्ड लावण्यात आले आहेत. यात भारताचा पाच हजार वर्षांपासूनच्या इतिहासाची माहिती दाखवण्यात आलीये.

10.भारत मंडपम नाव महात्मा बसवेश्वर यांच्या अनुभव मंडमप वरुन प्रेरित असल्याचं सांगितलं जातं. अनुभव मंडपममध्ये सार्वजनिक कार्यक्रम घेतले जात होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की अनुभव मंडपम वाद आणि संवादाच्या लोकशाही पद्धतीला दाखवते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT