Bhopal Crime News esakal
देश

धक्कादायक! स्कूल बसमध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार; चालकासह महिला मदतनीसला अटक

कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर चालक आणि महिला मदतनीस दोघांनाही अटक करण्यात आलीय.

सकाळ डिजिटल टीम

कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर चालक आणि महिला मदतनीस दोघांनाही अटक करण्यात आलीय.

भोपाळ : भोपाळमधील (Bhopal) रातीबाद पोलीस स्टेशन हद्दीत (Ratibad Police Station) असलेल्या एका नामांकित खासगी शाळेतील (Private School) नर्सरीच्या विद्यार्थिनीसोबत स्कूल बसमध्ये (School Bus) बलात्कार झाल्यानं खळबळ उडालीय.

मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर चालक आणि महिला मदतनीस दोघांनाही अटक करण्यात आलीय. रातीबाद पोलीस ठाण्यात आरोपी चालक आणि एका महिलेविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय आहे संपूर्ण प्रकरण

पीडित मुलीचं वय अवघे 3 वर्षे 6 महिने आहे. 8 सप्टेंबरला चिमुरडी शाळेतून घरी परतली, तेव्हा तिचा शाळेचा ड्रेस बदलण्यात आला होता. मुलीच्या आईनं तिला शाळेचा ड्रेस बदलण्याचं कारण विचारलं. तेव्हा तिनं सांगितलं, 'ड्रायव्हर काका मला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करतात आणि त्यांनी माझा ड्रेस बदललाय.' यानंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन तक्रार दाखल केली आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली. शाळा व्यवस्थापनानं फुटेज दाखवण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितलीय.

यासोबतच शाळा व्यवस्थापनानं बसमधील महिला मदतनीसला बोलावून चौकशी केली असता, तिनं बसमध्ये मुलगी पाणी पीत असल्याचं सांगितलं. मुलीच्या टी-शर्टवर पाणी पडलं होतं, त्यामुळं मुलीचा टी-शर्ट बदलावा लागला. शाळा व्यवस्थापनाच्या या गोष्टीवर कुटुंबीयांचा विश्वास बसत नव्हता. सोमवारी कुटुंबीयांनी आरोपींविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Rankings: जो रुट पुन्हा 'अव्वल', संघसहकाऱ्यालाच टाकलं मागं; शुभमन गिल - रिषभ पंतचीही क्रमवारी घसरली

'मला दगडू सारखा 'अडल्ट जोक्स' करणारा मुलगा कधी व्हायचचं नव्हतं' प्रथमेश परब स्पष्टच बोलला

Aquarius Compatibility: कुंभ राशीसाठी 'मेड फॉर इच अदर' कोण? जाणून घ्या राशीनुसार नात्याचं भविष्य

Snake Video : सायलेन्सरमध्ये लपला होता खतरनाक साप, गाडी सुरू होताच पायाला...अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : भाजपची पुण्यात पश्चिम महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित

SCROLL FOR NEXT