bhopal. 
देश

Bhopal Gas Tragedy: ती मृत्यूची रात्र, हजारो लोकांना दिवसही पाहता आला नाही

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- 2 आणि 3 डिसेंबर 1984  ची ती रात्र भारतीयांची झोप उडवणारी होती. यादिवशी भोपाळमधील अमेरिकी कंपनी यूनियन कार्बाइड प्लांटच्या 610 क्रमांकाच्या टँकमधील विषारी मिथाईल आयसोसायनेट गॅसची गळती होते. गॅस गळती अशावेळी झाली, जेव्हा भोपाळ शहर गाढ झोपेमध्ये होते. अनेकांना माहित नव्हतं की ती त्यांची शेवटची रात्र होती. लोकांना काही कळण्याच्या आतच शहराची हवा विषारी झाली होती. विश्वास बसणार नाही, पण तब्बल 15 हजार लोकांनी यामुळे आपला जीव गमावला असल्याचं सांगितलं जातं.  

शतकातील सर्वात भयानक औद्योगिक दुर्घटनेत सरकारी आकड्यांनुसार 5 हजार लोकांचा जीव गेला होता, पण लोक सांगतात की 15 हजार लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडित आजही जीवनाची झूंज देत आहेत. आपल्या प्रियजनांना गमावलेले लोक आजही भरपाई मिळण्यासाठी कायदेशीर लढाई  लढत आहेत. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार रात्री 10 वाजता गॅस गळती सुरु झाली. त्यानंतर 11 वाजता लोकांना याची जाणीव होऊ लागली. 

चौकशीवेळी लॉकअपमध्ये सीसीटीव्ही बसवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

यूनियन कार्बाइड कंपनीतून  मिथाइल आयसो साइनाइटची गळती झाली होती. भोपाळ गॅस गळतीमुळे जवळजवळ 5 लाख लोक प्रभावित झाले होते. स्थानिक लोक सांगतात की 1 तासातच हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते. रात्री झोपलेले लोक पुढच्या दिवशीची सकाळ पाहू शकले नव्हते. सर्वत्र आक्रोश, रडणे आणि ओरडणे ऐकू येत होते. 

भोपाळ गॅस दुर्घटनेला 37 वर्ष झाले आहेत, पण आजही या भागात विषारी गॅसचा प्रभाव जाणवतो. गॅस गळती पीडितांची दुसरी किंवा तिसरी पिढी कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. अनेक लहान बाळ आजही मानसिकरित्या अपंग जन्मतात. पीडितांना आजही नुकसान भरपाई मिळू शकलेली नाही. कंपनीने पीडितांना 10 लाख रुपये भरपाईचे आश्वासन दिले होते. अनेकांना मदत मिळाली आहे, पण अजूनही अनेकजण मदतीपासून वंचित आहेत. 

ब्रिटनला कोविड-19 लस मिळाली, पण भारताला मिळणे कठीण; जाणून घ्या कारण

माहितीनुसार 40 टन गॅसची गळती झाली होती. टँक क्रमांक 610 मध्ये विषारी गॅस मिथाईल आयसो सायनाईटमध्ये पाणी मिळाले होते. त्यानंतर रासायनिक प्रक्रिया झाली आणि टँकवर दबाव वाढला. दाबामुळे टॅक उघडला गेला आणि गॅस गळती झाली. पण, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही आणि मोठी दुर्घटना घडली.  या घटनेचे फोटो भीतीदायक आहेत. त्या दिवशी भोपाळच्या लोकांवर जी वेळ आली होती, ती शब्दात मांडणे कठीण आहे. 

(EDITED BY- KARTIK PUJARI)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: सक्षम खातील, दुर्बल बघत राहतील... मूळ ओबीसींच काय होणार? नेपाळसारखी परिस्थिती अन्...; आरक्षण अभ्यासकांचा इशारा

Digital Minister: मंत्रिपदाची जबाबदारी 'एआय'वर; टेंडर्सवर ठेवणार नजर, भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले

Central Government Employees and Pensioners: दिवाळीआधी केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांना सरकारकडून मिळणार मोठा दिलासा!

Ashes 2025-26 : मॅथ्यू हेडन विवस्त्र होऊन MCG स्टेडियमला चक्कर मारणार? मुलगी ग्रेसची Joe Root ला एक विनंती, वाचा काय प्रकरण

Jan Aushadhi Kendra: आता घराजवळच स्वस्त औषधे मिळणार! हजारो जनऔषधी केंद्र उघडणार, नवा नियम कधीपासून लागू होणार?

SCROLL FOR NEXT