Gujrat Election BJP
Gujrat Election BJP Sakal
देश

Gujarat Election 2022 Result : भाजपचं ठरलं! 'हा' नेता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; मोदी-शहांनी...

Amit Ujagare (अमित उजागरे)

Gujrat Assembly Election 2022 Result : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत विविध नावं चर्चेत होती.

पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेणार आहे. (Bhupendra Patel to take oath as Gujarat CM on December 12 PM Modi Amit Shah to attend ceremony)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी ही घोषणा केली आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. भाजपनं या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्या आहेत.

भूपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पहिल्यांदा त्यांची भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी १२ सप्टेंबर २०२१ रोजी निवड झाली होती. निकालामध्ये भाजप स्पष्ट बहुमत मिळवत असल्याचे कल दिसत असल्यानं सी आर पाटील यांनी भूपेंद्र पटेल यांना घेऊन पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पटेल हेच मुख्यममंत्रीपदाची शपथ घेतील असं जाहीर केलं. भाजप राज्यात सातव्यांदा सरकार स्थापन करणार आहे.

पटेल म्हणाले, भाजपला गुजरातच्या जनतेनं दिलेला जनादेश मान्य असल्याचं म्हटलं आहे. आम्ही दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यास कटिबद्ध आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT