Made in India iPhone
Made in India iPhone 
देश

Made in India iPhone: 'मेड इन इंडिया' आयफोनला मोठी मागणी! ६५ टक्क्यांनी वाढली विक्री

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरु : 'मेड इन इंडिया' आयफोनच्या विक्रीमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत २०२२मध्ये ६५ टक्क्यांनी वाढ झाली असून १६२ टक्क्यांनी त्याची किंमतही वाढली. यामुळं देशातील आयफोनची उत्पादन क्षमतेतही वाढ झाली आहे. यामुळं आयफोनच्या ब्रँड व्हॅल्यू शेअर २०२२ मध्ये २५ टक्क्यांवर पोहोचला जो २०२१ मध्ये १२ टक्क्यांवर होता. रिसर्च फर्म काउंटर पॉईंटनं याबाबतचा डेटा जाहीर केला आहे. (Big demand for Made in India iPhone shipment increased by 65 percent)

फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनसह अनेक Appleचे भागीदार बंगळुरुमध्ये iPhones असेंबल करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी पहिल्या कारखान्याचं उद्घाटन केल्यानंतर पेगाट्रॉन चेन्नईमध्ये दुसरा कारखाना उभारण्याचा विचार करत असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. तैवानची आयफोन निर्माता कंपनी फॉक्सकॉनने देखील बेंगळुरूमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे.

Oppo ने 2022 मध्ये 22 टक्के शेअर्ससह 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन्सच्या विक्रीत अव्वल स्थान पटकावलं होतं. त्यानंतर सॅमसंगचा क्रमांक लागतो. 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन्सच्या निर्यातीचा हिस्सा 2022 मध्ये २० टक्के (व्हॉल्यूम) आणि 30 टक्के (व्हॅल्यू) या दोन्ही बाबतीत सर्वोच्च पातळीवर आहे.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

चीनमधून भारतात आल्यानंतर आयफोनच्या बिझनेसमध्ये वाढ

काउंटरपॉईंट अहवालात म्हटलं की, अॅपल, सॅमसंग आणि इतर स्मार्टफोन्सच्या वाढत्या निर्यातीमुळं 2022 मध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित स्मार्टफोन्सच्या विक्री वाढल्या असून स्थानिक मागणी घटल्याचा परिणाम काही प्रमाणात कमी झाला आहे. एकंदरीत, 'मेड इन इंडिया' स्मार्टफोनची विक्री 2022 (जानेवारी-डिसेंबर) मध्ये वर्षाच्या तुलनेत 3 टक्क्यांनी कमी होऊन 188 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

काउंटरपॉईंटचे वरिष्ठ संशोधन प्रचीर सिंग म्हणाले, "स्मार्टफोनच्या एकूण पुरवठ्यावर परिणाम आता उत्पादन स्तरावर जाणवत आहे. तथापि, प्रीमियमच्या ट्रेंडमुळं काही उत्पादकांना फायदा होत आहे. Appleच्या EMS 2022 (इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवा) च्या चौथ्या तिमाहीत फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन या पहिल्या 10 मध्ये सर्वात वेगानं वाढणारे उत्पादक होते. अॅपलच्या वाढत्या निर्यातीमुळेही वाढीला चालना मिळाली असून एकूण निर्यातीत वार्षिक 37 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT