Hindenburg Research makes money as Adani group shares tumble know What is short selling and how is it done  
देश

Gautam Adani-Hindenburg Research : अदानींना तिसरा धक्का! महत्त्वपूर्ण डील हातातून निसटली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अडचणीत सापडलेल्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. सीके बिर्ला समूहाची कंपनी ओरिएंट सिमेंटने अदानी पॉवर महाराष्ट्रसोबतचा करार रद्द केला आहे.

ओरिएंट सिमेंट यांच्यानुसार, अदानी समूह या करारासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यात अपयशी ठरला. ओरिएंट सिमेंटने सप्टेंबर २०२१ मध्ये अदानी समूहासोबत सामंजस्य कराराची घोषणा केली होती.

कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, अदानी पॉवरने हा करार न करण्याची विनंती केली आहे. 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला हा तिसरा मोठा धक्का आहे. पहिल्यांदा, त्यांना DB पॉवर खरेदी करण्याचा करार पूर्ण करता आला नव्हता. त्यानंतर PTC India साठी बोली लावण्यापासून अदानी समूहाने माघार घेतली होती.

दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्रातील तिरोडा येथे सिमेंट ग्राइंडिंग युनिट स्थापन करण्यासाठी सप्टेंबर 2021 मध्ये सामंजस्य करार केला होता. त्यासाठी ओरिएंट सिमेंटने 35 एकर जमीनही पाहिली होती. परंतु ओरिएंट सिमेंटचे म्हणणे आहे की अदानी पॉवरला त्यांच्या प्लांटसाठी एमआयडीसीकडून आवश्यक मंजुरी मिळू शकली नाही.

तसेच या सामंजस्य कराराची कालमर्यादाही निघून गेली आहे. बुधवारी अदानी पॉवरचा समभाग पाच टक्क्यांनी घसरून १६२.४५ रुपयांवर बंद झाला, तर ओरिएंट सिमेंटचा समभाग दोन टक्क्यांनी घसरून ११७.३५ रुपयांवर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT