Narendra Modi vs Shatrughan Sinha esakal
देश

TMC MP : मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर..; लोकसभा निवडणुकीबाबत शत्रुघ्न सिन्हांचं मोठं विधान

आमचे मित्र नरेंद्र मोदी हे सक्षम पंतप्रधान मानले जात असतील तर तेजस्वी यादवमध्ये काय कमी आहे? असा सवाल त्यांनी केला.

सकाळ डिजिटल टीम

शत्रुघ्न सिन्हा आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यात अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे.

पाटणा : जर नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान होऊ शकतात तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनण्यात गैर काय आहे? असा सवाल अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थित केलाय.

संख्याबळ आणि जनतेचा पाठिंबा असेल तर आम्ही आणि तुम्हीही मुख्यमंत्री-पंतप्रधान (CM PM) होऊ शकतो. शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) पाटणा विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधत होते.

सिन्हा म्हणाले, आमचे मित्र नरेंद्र मोदी हे सक्षम पंतप्रधान मानले जात असतील तर तेजस्वी यादवमध्ये काय कमी आहे? असा सवाल त्यांनी केला. शत्रुघ्न सिन्हा आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यात अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. भाजपचे खासदार असताना शत्रुघ्न यांनी रांची तुरुंगात लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली होती.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पाटणा साहिबमधून ते (सिन्हा) काँग्रेसचे उमेदवार होते. राजदनं त्यांना पाठिंबा दिला होता. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, राहुल गांधींसह देशातील अनेक नेते पंतप्रधानपदासाठी सक्षम आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. त्या एक जबरदस्त नेता आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्या गेमचेंजर ठरू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

SCROLL FOR NEXT