delhi police main.jpg 
देश

दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जैशच्या 2 दहशतवाद्यांना अटक, स्फोटकांचा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- देशभरात उत्साहात दिवाळी साजरी केली जात असतानाच दिल्ली पोलिसांनी एक जबरदस्त कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा या दोघांचा कट होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळण्यात आला आहे. 

अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक जण जम्मू-काश्मीरमधील बारामुला आणि दुसरा कुपवाडा येथे राहणारा आहे. पोलिसांना त्यांना सरायकाले खां नजीक अटक केले. दोघांकडून मोठ्याप्रमाणत स्फोटके आणि दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. 

या दोघांनी दिल्ली-एनसीआर येथील अनेक ठिकाणांवर हल्ल्याचा कट रचल्याचे चौकशीत समजले. त्यांच्या निशाण्यावर अनेक व्हीआयपी व्यक्ती होते. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन सेमीऑटोमॅटिक पिस्टर आणि 10 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. दिल्लीत मोठा हल्ला करण्याचा त्यांचा कट असल्याचे पोलिसातील सूत्रांनी सांगितले. 

हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी गटात सामील झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत होते. अनेकवेळा सीमा पार करुन जाण्याचा त्यांचा प्रयत्न फसला होता. सीमेवर भारतीय जवानांच्या कडक सुरक्षेमुळे ते सातत्याने अपयशी ठरले होते. 

या दोघांबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. दोन्ही दहशतवादी हे 20 ते 22 वयोगटाचे आहेत. या दोघांची कसून चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

LPG चं टेन्शन तर काहीच नाही..अजून खरा बॉम्ब ब्लास्ट आहे बाकी; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार युद्धाची झळ, 'या' 15 वस्तू महागणार

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवर पुलाव तर तुला जपणार आहेच्या सेटवर चुलीवरचं जेवण, चहा सुद्धा केला बंद!

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT